Kuttey song : अर्जुन कपूरच्या आगामी ‘कुत्ते’ चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज (video)

Kuttey movie
Kuttey movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री तब्बू यांचा बहुप्रतीक्षित आगामी 'कुत्ते' (kuttey) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. दोन दिवसांपूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला होता. आता (kuttey) या चित्रपटातील पहिलं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अभिनेता अर्जुन कपूरच्या इन्स्टाग्रामवर आगामी 'कुत्ते' (kuttey) चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचे बोल 'आवारा डॉग्स' (Awaara Dogs) असे आहेत. या गाण्यात अर्जुन आणि तब्बूचा धमाकेदार परफार्मन्स पाहायला मिळतोय. या गाण्याला विशाल ददलानीने गायले असून विशाल भारद्वाजने म्युझिक दिले आहे. तर भूषण कुमारच्या टी- सीरिज युट्युब चॅनेलवर हे गाणे पाहायला मिळतेय.

या चित्रपटात अर्जुन कपूर आणि तब्बूसोबत बॉलिवूड अभिनेता नसीरूद्दीन शाह, कोंकणा सेनशर्मा, राधिका मदान, कुंमुद मिश्रा आणि शार्दुल भारद्वाज यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज यांनी केलं आहे. तर विशाल भारद्वाज आणि आसमान भारद्वाज यांनी मिळून चित्रपटातील गाणी लिहिली आहेत. आसमान भारद्वाज यांनी दिग्दर्शन केलेला 'कुत्ते' हा पहिला चित्रपट आहे.

या चित्रपटाची निर्मिती लव्ह फिल्मस् आणि विशाल भारद्वाज फिल्मस् याच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज यांनी केली आहे. हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात येणार आहे. यामुळे खुपच दिवसांनी अर्जून कपूर चित्रपटात दिसणार असल्याने चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news