‘माझी तुझी रेशीमगाठ’: ‘शेफाली’ माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली : काजल काटे | पुढारी

'माझी तुझी रेशीमगाठ': 'शेफाली' माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली : काजल काटे

मुंबई; पुढारी ऑनलाईन: सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका गाजत आहे. त्यामधील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरांत पोहोचली आहे. मालिकेत अजून एक व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे ‘शेफाली’. नेहाची कलीग आणि जवळची मैत्रीण शेफाली हिची भूमिका अभिनेत्री काजल काटे अगदी चोख बजावत आहे.

व्यक्तिरेखेबद्दल बोलताना काजल म्हणाली की, ‘शेफाली ही माझ्यासारखीच आहे. आनंदी, सगळ्यांना हसवणारी आणि काहीशी अल्लड अशी सुद्धा आहे. त्यामुळे शेफाली माझ्या फार जवळची आहे आणि ती साकारताना मला खूप मजा येत आहे.

शेफाली म्हंटल कि, माझ्या डोळ्यासमोर आले ते ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील काजोल आणि ‘जाब वी मेट’ मधली करीना. या दोघींचं मिश्रण म्हणजे शेफाली. शेफाली हे खूप एनर्जेटिक कॅरेक्टर आहे. त्यामुळे सेटवरही मला सतत एनर्जेटिक राहावं लागतं.’

प्रेक्षकांकडून शेफालीला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना काजल म्हणाली, ‘शेफाली माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली आहे. शेफालीने माझं आयुष्य बदलून टाकलंय. मला आज लोकं ओळखायला लागली आहेत. आता मी सुद्धा काहीसा शेफालीप्रमाणे विचार करायला लागले आहे.

त्यामुळे मीच स्वतः शेफालीच्या प्रेमात आहे. तिच्यावर प्रेक्षक ही खूप प्रेम करतात. मला मेसेजेस, फोनद्वारे चाहते आवर्जून प्रतिक्रिया कळवतात. शेफालीसारखी आमच्या आयुष्यात एक तरी मैत्रीण असावी अशी प्रतिक्रिया जेव्हा मला मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला असल्याचे तिने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का? 

 

पाहा व्हिडिओ : अभिनेत्री अदिती सारंगधरने बनवला फक्कड चहा 

Back to top button