सायली चौधरी हिने धरला 'मुंबई इंडियन्स थीम'वर ठेका - पुढारी

सायली चौधरी हिने धरला 'मुंबई इंडियन्स थीम'वर ठेका

मुंबई; पुढारी ऑनलाईन: ‘दुनिया हिला देंगे हम’ या ब्रीदवाक्यावर ‘मुंबई इंडियन्स’चे थीम सॉंग मुंबईकरांना ठेका धरायला लावत आहे. मुंबईच्या प्रत्येक कुटुंबाचा हा अभिमान आहे. ‘मुंबई इंडियन्स’ असा संदेश देणारा हा थीम सॉंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वच खेळाडू या व्हिडिओमध्ये नाचताना दिसत असून, मराठी अभिनय क्षेत्रातील अभिनेत्री सायली चौधरी हिने देखील या व्हिडीओमध्ये ठेका धरला आहे.

स्वतःच्या अंगी असलेल्या कलागुणांना जोपासत सायली चौधरी हिने पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या थीमकरिता नृत्यांगना म्हणून काम केले. अभिनयासह लहानपणापासून असलेली नृत्याची आवड जोपासत तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सायली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून तिचे लाखे चाहते आहेत.

नाटक आणि मालिका विश्वात कार्यरत असलेली सायली कायमच अभिनयाला प्रथम प्राधान्य देत आली. ‘रुंजी’, ‘देवयानी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘लक्ष्य’, ‘छत्रीवाली’, ‘अस्मिता’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘कारभारी लयभारी’, ‘सारे तुझ्याच साठी’ यासारख्या बऱ्याच मालिकांमधून सायलीने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

‘झिम पोरी झिम’, ‘गलतीसे मिस्टेक’ या नाटकांतूनही सायलीने उत्तम कामगिरी करत अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटविला. बऱ्याच जाहिरातींमधूनही सायलीचा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला.

एक उत्कृष्ट अभिनेत्री असलेली सायली एक उत्तम नृत्यांगना देखील आहे हे या व्हिडीओ मधून प्रेक्षकांना पाहणे रंजक ठरणार आहे.

अभिनयाप्रमाणे तिच्या नृत्यालाही प्रेक्षक भरभरून दाद देत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button