करुणा मुंडे-शर्मा यांना जामीन मंजूर

Karuna Munde
Karuna Munde

अंबाजोगाई; पुढारी वृत्‍तसेवा : करुणा मुंडे यांना जामीन मंजूर झाला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा मुंडे/ शर्मा यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान काल (सोमवार) सुनावणी झाली, मात्र निकाल राखीव ठेवला होता. आज मंगळवारी (दि.21) त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर करुणा मुंडे यांना जामीन मंजूर केला.

परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा मुंडे/शर्मा या 6 सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले.

यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा मुंडे/शर्मा यांच्या वतीने अ‍ॅड. भारजकर यांनी बाजू मांडली. करुणा मुंडे/शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवली होती, तर करुणा शर्मा यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. भारजकर यांनी केला.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावर मंगळवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता करुणा शर्मा पुढे काय पाऊल उचलणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news