Avtar 2 Collection : वर्षातील सर्वात मोठं ओपनिंग करणारा चित्रपट ठरला 'अवतार-२' | पुढारी

Avtar 2 Collection : वर्षातील सर्वात मोठं ओपनिंग करणारा चित्रपट ठरला 'अवतार-२'

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपट अवतार: द वे ऑफ वॉटर चित्रपटगृहांमध्ये (Avtar 2 Collection) प्रदर्शित झाला आहे. २००९ मध्ये आलेल्या अवतारचा हा सिक्वेल आहे. पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून त्याच्या सिक्वेलची वाट पाहत होते. अवतार : द वे ऑफ वॉटरने पहिल्या दिवसापासून भारतीय बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. ट्रेड अॅनालिस्टच्या मते, या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. अवतार: द वे ऑफ वॉटर संपूर्ण भारतातील ३ हजार ८०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. रोज या चित्रपटाचे १७ हजार शो आहेत. (Avtar 2 Collection)

अवतार : द वे ऑफ वॉटरच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अहवाल आला आहे. या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी ३०-४० कोटींची कमाई केली आहे. जरी हे अंदाजे आकडे आहेत. हॉलिवूड लाईफ या इंग्रजी वेबसाईटनुसार, अवतार: द वे ऑफ वॉटरची पहिल्या दिवशी भारतभरात एकूण ४ लाख ४२ हजार ९६० विक्री झाली आहे. त्यामुळे चित्रपट ३०-४० कोटींचा गल्ला जमवण्याची शक्यता आहे.

अवतार : द वे ऑफ वॉटरची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ असल्याचे सांगण्यात येत आहे. अवतार २ चे आगाऊ बुकिंग १० दिवस अगोदर सुरू झाले. यावरून याचा अंदाज लावता येतो. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, ३ नॅशनल चेन पीव्हीआर, आयनॉक्स यांनी दोन दिवसांपूर्वीपर्यंत २ लाख ७५ हजार अॅडव्हान्स तिकिटांची विक्री केली होती. १३ वर्षांपूर्वी रिलीज झालेला अवतार सुमारे २३७ मिलियन डॉलरमध्ये बनवण्यात आला होता. त्याचवेळी अवतार: द वे ऑफ वॉटर बनवण्यासाठी डॉलर ३५० दशलक्ष खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमेरून यांनी केले आहे.

Back to top button