पुणे : पोलिसावर दगडफेक करणार्‍यांना पकडले

पुणे : पोलिसावर दगडफेक करणार्‍यांना पकडले

पुणे : रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांना वारजे पोलिसांनी पाठलाग करून पकडले तर इतर सात ते आठजणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पुल्या उर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे(वय19, रा.रामनगर, वारजे), व्यंकटेश पिलवकर (वय19,रा. आंबेगाव बु.), अमुल पवार (वय19, रा.कर्वेनगर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी गोविंद फड यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.15) रात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास गणपती माथा परिसरात घडला आहे.

फिर्यादी पोलिस कर्मचारी फड हे रात्रगस्तीवर होते. दरम्यान, गर्दी हटवण्यासाठी गेलेल्या फडवर अचानक आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक केली. दगडफेक केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. फड यांनी आपल्या साथीदारांना याची माहिती दिली. त्यानंतर पळून गेलेल्या तिघांंना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सी.जी.जवळगी करीत आहेत.

खरेदीसाठी आल्या अन् मंगळसूत्र घेऊन गेल्या
मंगळसूत्र खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत आलेल्या दोन महिलांनी 1 लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरी करून पळ काढला. ही घटना जगताप चौक वानवडी येथील दिनेश ज्वेलर्स या सराफ पेढीत नुकतीच घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघा अनोळखी महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिनेश पालरेचा (वय 52,रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या सराफ पेढीत सोन्याचे मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी दोन महिला आल्या होत्या. त्यावेळी फिर्यादींची नजर चुकवून त्यांनी एक लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरी करून पळ काढला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news