Avatar 2: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ ऑनलाईन लीक

 Avatar The Way of Water
Avatar The Way of Water
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट रिलीज होण्याआधी ऑनलाईन लीक होतातचं. पण, एखाद्या चित्रपटाच्या ग्लोबली रिलीजच्या २४ तास आधी लीक होणे चिंता असणारी गोष्ट आहे. मोस्ट अवेटेड चित्रपट 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar 2) आज रिलीज झालाय. काही युरोपीय देशांमध्ये प्रीमियरनंतर आणि ग्लोबली थिएट्रीकल रिलीजआधी ऑनलाईन लीक होते. (Avatar 2)

अनेक पायरेटेड वेबसाईटवर 'अवतार २' उपलब्ध झाले आहे. प्रिंट ऑडिओ क्वालिटी इतकी चांगली नाही. व्हिडिओ थिएटरमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहे, अनेक व्हिडिओ रिपिंग सॉफ्टवेअरचा वापर करत क्लीन करण्यात आले आहे.

लीक झालेली प्रिटंती क्वालिटी फार चांगली नाही. लीक झाल्यानंतरदेखील अवतार २ जगभरात बॉक्स ऑफिसवर $500 मिलियनहून अधिक कमाई करण्याच्या मार्गावर आहे.

जेम्स कॅमेरूनचे दिग्दर्शन

अवतार २ उर्फ ​​अवतार : द वे ऑफ वॉटर (Avatar: The Way of Water) २०२२ मध्ये स्क्रीनवर हिट होणारा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. जेम्स कॅमेरूनने याचे दिग्दर्शन केले आहे. ६ डिसेंबर रोजी लंडनमध्ये हा चित्रपट रिलीज झालाय. आज यूएसए मध्ये रिलीज झालाय. २००९ मध्ये आलेल्या 'अवतार' चा सीक्वल आहे. १३ वर्षांनंतर 'अवतार' चित्रपटाची दुसरी सीरीज आलीय. सॅम वर्थिंगटन, जो सलदाना, स्टीफन लँग, केट विंसलेट, सिगोरनी वीवरसह अनेक कलाकार या चित्रपटात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news