Vivek Oberoi : ‘आयुष्यात काहीचं राहिलं नाही,’ आत्महत्या करणार होता विवेक | पुढारी

Vivek Oberoi : 'आयुष्यात काहीचं राहिलं नाही,' आत्महत्या करणार होता विवेक

पुढारी ऑनलाईन डेस्क : विवेक ओबेरॉयला (Vivek Oberoi ) त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. चॉकलेट बॉयची भूमिका असो वा गँगस्टर, तो पडद्यावर आपली प्रत्येक भूमिका साकारण्यासठी जीवतोड मेहनत घेतो. परंतु, एक काळ असा आला की, करिअरमध्ये आलेले अनेक चढ-उतार त्याला सहन करावे लागले. आयुष्यात अशीही वेळ आली की, त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण, अशा कठीण प्रसंगात त्याची पत्नी प्रियांकाने त्याला साथ दिली. (Vivek Oberoi)

नकारात्मकतेने चिंतेत

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने आपल्या आयुष्यातील अनेक वाईट प्रसंग सांगितले. ते म्हणाले, ‘मी नेहमी आसपासच्या नकारात्मकतेने खूप चिंतेत राहायचे. कधी-कधी तुम्ही मानसिकदृष्टीने खचता. परंतु, मला वाटतं की, त्यावेळी माझ्या आयुष्यात प्रियांकाने खूप महत्तवाची भूमिका साकारली होती.’ विवेकचं म्हणणं होतं की, फॅमिली आणि फॅन्सच्या प्रेमाने त्याला सावरायला खूप मदत केली. नाहीतर सगळं काही संपुष्टात आलं असतं.

विवेक ओबेरॉय म्हणाला, ‘कधी मन क्रूर होतं. तुम्हाला काहीही करायला भाग पाडतं. जेव्हा सातत्याने तुम्हाला हे विचार मनात येऊ लागतात, तेव्हा धैर्य, स्ट्रेंथ आणि आंतरिक आनंदाने एक दिवस हा अनुभव येतो की, हेच तुमचं सत्य आहे.

आत्महत्या करण्याचा आला होता विचार

विवेक ओबेरॉयने हेदेखील स्वीकार केलं की एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याच्या मनात आतम्हत्येसारखे विचार आले होते. तो म्हणाला की, ‘हेच कारण आहे जे सुशांत सिंह राजपूत आणि अन्य लोकांसोबत झालं होतं. मी अनुभवलं आहे. मी तो अंधार आणि त्रास अनुभवला आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

Back to top button