Sweet potatoes : हिवाळ्यात रताळे ठरतात लाभदायक

Sweet potatoes
Sweet potatoes

नवी दिल्ली : गाजर, बीट, रताळे (Sweet potatoes) यांचे आरोग्यासाठीचे महत्त्व अधिक आहे. विशेषतः हिवाळ्यामध्ये रताळ्यांचे सेवन हे लाभदायक ठरत असते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अनेक शहरांमध्ये मंच आचेवर भाजलेले किंवा उकडलेले रताळ स्टार फ्रुट, मसाले आणि लिंबूच्या रसाबरोबर खायला मिळते. आपल्याकडे विशेषतः उपवासाच्या दिवशीच रताळ खाल्ले जात असले, तरी ते एरवीही खाणे लाभदायक आहे. याचे कारण म्हणजे रताळ हे एक 'सुपर फूड'च आहे.

रताळ्यात (Sweet potatoes) आयर्न (लोह), फोलेट, कॉपर, कार्बोहायड्रेटस्, झिंक, मॅग्नेशियम आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी रताळी गुणकारी ठरतात. प्राचीन काळापासूनच भारतीयांच्या आहारात रताळी आहेत. काही दशकांपूर्वीपर्यंत तर देशातील अनेक लोक रात्रीच्या जेवणात रताळ्याचाही समावेश करीत असत; मात्र त्यानंतर भात-गव्हासारख्या धान्यांनी आहाराची अधिक जागा घेतली.

आता नव्या संशोधनांमुळे खेड्यात तसेच शहरी भागातही रताळ्यांचा आहारातील समावेश वाढला आहे. शहरांमध्ये तर अनेक मुलांच्या डब्यात हा 'स्वीट पोटॅटो' (Sweet potatoes) असतोच. 'स्ट्रीट फूड' म्हणूनही रताळ्यांचा वापर वाढला आहे. बटाट्याच्या तुलनेत रताळ्यात जीवनसत्त्वे व खनिजांचे प्रमाण अधिक असते.

'अ' आणि 'क' जीवनसत्त्व हे रताळ्यात मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे डोळे व त्वचेसाठी त्याचा लाभ होतो. रताळ्यातील (Sweet potatoes) फायबर चयापचय क्रिया व पचनसंस्थेसाठी लाभदायक ठरतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार थंडीच्या दिवसात सामान्य पचनसंस्था असणार्‍या लोकांनी शंभर ग्रॅमपर्यंत रताळ खावे; मात्र रताळ्यात कॅल्शियम ऑक्सलेट अधिक प्रमाणात असल्याने ते मुतखड्याचेही कारण बनू शकते. ज्यांना आधीच ही समस्या आहे त्यांनी रताळी खाऊ नयेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news