Cyber Crime : सावधान, ‘सायबर फ्रॉड’ विणताहेत ‘सिमकार्ड स्वॅपिंग’चे जाळे, क्षणार्धात होते बँक खाते रिकामे

Cyber Crime
Cyber Crime

पुढारी ऑनलाईन: Cyber Crime : आजकाल लोक नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन व्यवहार आणि त्यांची कामे अगदी सहज करत आहेत. हे व्यवहरा करताना कोणत्याही पद्धतीची फसवणूक टाळण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP (वन टाईम पासवर्ड) येतो, त्याच्या शिवाय व्यवहार करता येणे शक्य नाही. मात्र, सायबर गुन्हेगारांनी आता थेट 'सिमकार्ड स्वॅपिंग'च्या मार्फत थेट तुमचा मोबाईल नंबरच मिळवतात. यामुळे ओटीपी देखील त्यांच्या मोबाईलवर जातो आणि क्षणार्धात तुमचे बँक खाते रिकामे होते.

Cyber Crime : काय आहे 'सिमकार्ड स्वॅपिंग'

ज्या प्रकारे एखाद्या एटीएममध्ये स्कॅमर बसवून एटीएमची माहिती चोरून ती दुस-या एखाद्या साध्या कार्डवर ट्रान्सफर करता येते आणि त्याद्वारे सायबर क्राईम करता येते. त्याच प्रकारे तुमचा मोबाइल नंबर देखील चोरून दुस-या सीमकार्डवर बदलता येऊ शकतो. अशा प्रकारे तुमचा नंबर दुस-या सिमकार्ड वर बदलून केला जाणा-या फसवणुकीला 'सिमकार्ड स्वॅपिंग' असे म्हणतात.

Cyber Crime : अशी केली जाते सिमकार्ड स्वॅपिंग

सीमकार्ड स्वॅपिंगसाठी गुन्हेगार थेट टेलिकॉम ऑपरेटरला संपर्क साधतात. त्यांना आपल्या एखाद्या ट्रिकमध्ये फसवून त्यांच्याजवळील दुस-या एखाद्या सिम कार्डवर तो युजरचा (ज्याला फसवायचे आहे त्याला) मोबाइल नंबर अॅक्टिवेट करून घेतो. एकदा हा नंबर अॅक्टिवेट झाला की मग युजरच्या मोबाइल नंबरचा ताबा स्कॅमर्सकडे जातो. युजरच्या नंबरवरील कोणतेही मॅसेज किंवा फोन कॉल तसेच ओटीपी देखील त्या स्कॅमर्सकडे जातात.

Cyber Crime : सिम स्वॅपिंगमध्ये गुन्हेगार कोणत्याही सिमवर वापरकर्त्याचा नंबर अॅक्टिव्ह करू शकतात. एकदा फसवणूक करणा-याने असे केल्यास सिमकार्डचा कंट्रोल त्याच्या हातात येतो. कोणीही त्या सिमकार्ड नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकतो. यामुळे कोणीही या नंबरवर कॉल किंवा मेसेज केला तर, तो कॉल यूजर्सला रिसिव्ह करता येणार नाही तर, तो स्कॅमरकडे जाईल.

Cyber Crime : अशा प्रकारे एखाद्या युजरचा सिमकार्ड स्वॅप करण्यासाठी 4 ते 5 गुन्हेगारांची टीम कार्य करते. पहिले युजरची फिशिंग लिंक किंवा अन्य  माध्यमातून नाव, इमेल आयडी, अॅड्रेस आदि मूलभूत माहिती मिळवली जाते. नंतर सातत्याने फोन करून त्रास देण्यात येतो. ज्यामुळे वैतागून युजर मोबाइल स्विच ऑफ करून ठेवतो. या वेळेचा फायदा उचलून स्कॅमर मोबाईल टेलिकॉम ऑपरेटरला फोन करून त्याला तुमच्या मूलभूत माहितीच्या आधारे ट्रिकद्वारे फसवतो आणि त्याच्या जवळील सिमवर युजरचा मोबाईल नंबर अॅक्टिव करून घेतो.

पुढे जेव्हा युजरला कोणतेही फोन, मेसेजस येतात तेव्हा ते त्या दुस-या नंबरवर ऑटोमॅटिक फॉरवर्ड होतात. इतकेच काय तर बँक व्यवहरासाठीचा ओटीपी देखील त्या सिमकार्ड वर जातो. परिणामी तुमचे बँक अकाउंट क्षणार्धात खाली होऊ शकते.

Cyber Crime : या फसवुकीच्या घटनांमध्ये असा करा बचाव

  • तुम्हाला फिशिंग, स्मिशिंगपासून दूर राहावे लागेल. याद्वारे तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी महत्वाची माहिती चोरतात. त्यानंतर ते तुमची फसवणूक करतात.
  • जेव्हा फसवणूक करणारे तुमची माहिती चोरतात आणि तुमच्या नंबरद्वारे नवीन सिम कार्ड सक्रिय करतात, तेव्हा तुमचे असलेले सिम कार्ड निष्क्रिय होते. अशा परिस्थितीत, जर तुमचे सिम कार्ड कधीही निष्क्रिय असेल, तर तुम्ही ताबडतोब दूरसंचार ऑपरेटरशी संपर्क साधावा.
  • अनेक वेळा फसवणूक करणारे लोक त्यांना फोन करून त्रास देऊ लागतात, तेव्हा लोक कंटाळतात आणि मोबाईल बंद करतात. त्याच वेळी, फसवणूक करणारे देखील त्याच गोष्टीची वाट पाहतात की तुम्ही तुमचा फोन बंद करता. कारण तुमचा मोबाईल बंद केल्याने त्यांना दुस-या सिम वर तुमचा नंबर सक्रिय करण्यासाठी वेळ मिळतो. जर तुम्हाला फसवणुकीचे कॉल येत असतील तर फोन बंद करू नका.
  • कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास नेट बँकिंग इत्यादींचा पासवर्ड लवकरात लवकर बदला. ईमेलवरही नियमित बँक व्यवहारांचे तपशील तपासत राहा. काही काळानंतर तुमचे बँकिंग पासवर्ड बदलत राहा.
  • बँक स्टेटमेंट वेळोवेळी काढा. फसवणूक झाल्यास ताबडतोब बँकेशी संपर्क साधा. सिम स्वॅपिंगमध्ये फसवणूक झाल्यास, सर्वप्रथम
  • तुम्हाला तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक करावे लागेल, त्यानंतर तुमच्या बँकेला लेखी किंवा कॉलद्वारे कळवावे लागेल.
    अशाप्रकारची फसवणूक झाल्यास तुम्ही तुमची तक्रार https://cybercrime.gov.in वर नोंदवू शकता.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news