Avatar The Way Of Water : जेम्स कॅमेरूनच्या आईच्या स्वप्नातून तयार झाला ‘अवतार’

Avatar-The-Way-of-Water
Avatar-The-Way-of-Water

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात महागडा चित्रपट अवतार-द वे ऑफ वॉटर उद्या १६ तारखेला रिलीज होत आहे. या चित्रपटाचे बजेट २५० मिलियन डॉलर्स (२००० कोटी रुपयांमध्ये) आहे.  त्रपट अवतारची संकल्पना एका स्वप्नातून आलेली आहे. (Avatar The Way Of Water) चित्रपट दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनची आई शर्ली कॅमेरून यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. या स्वप्नामध्ये त्यांनी एका निळ्या रंगाच्या तरुणीला पाहिलं होतं, तिची उंची जवळपास १२ फूट होती. शर्ली यांनी जेम्सला हे स्वप्न सांगितले. कॅमेरून यांना अशा एक ग्रहाच्या कहाणीची आयडिया आली, ज्या ग्रहावर निळ्या रंगाचे लोक राहतात आणि त्यांची उंची १० ते १२ फूट असते. हा काळ तेव्हाचा होता,

(Avatar The Way Of Water) अवतार चित्रपटाच्या १३ वर्षांनंतर दुसरा भाग येत आहे. अवतारच्या आधी जेम्‍स यांच्‍या  टायटॅनिक ही जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. मग, २००९ मध्ये अवतारने हा रेकॉर्ड मोडला. जेम्स कॅमेरून यांनी चित्रपटांच्या टेक्नॉलॉजीमध्ये 'वेळेच्या पुढे' असा प्रयोग केला. आपला पहिला चित्रपट द टर्मिनेटर ते अवतार-२ पर्यंत त्यांचे करिअर आणि चित्रपटांची निर्मीती करण्याची पद्धत आश्चर्यचकित करणारं आहे. जेम्स स्वत: कथा लिहितात आणि स्वत: दिग्दर्शित करण्याची पद्धत अवलंबतात.

असा आणला 'अवतार'

अवतारसाठी कॅमेरून यांनी २००६ मध्ये स्क्रिप्टवर काम केलं. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एलियन्ससाठी त्यांनी एक वेगळी भाषा देखील बनवली. भाषातत्वज्ञ डॉ. पॉल फ्रॉमर यांनी ती भाषा तयार केलीय. ही भाषा १ हजार शब्दांनी बनवली गेली. यामध्ये जेम्स कॅमेरून यांनी ३० शब्द जोडले होते. हा चित्रपट तयार करण्यासाठी जेम्स कॅमेरूनने सेटअपदेखील वेगळा लावला होता.

या चित्रपटाने टायटॅनिकचा रेकॉर्ड तोडला होता. आणि जगात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.  जेम्स या चित्रपटाचे ६-७ सीरीज देखील बनवू शकतात. त्यांनी हे म्हटलं आहे की, हा निर्णय चित्रपटांची कमाई आणि प्रेक्षकांच्या मागणीवर घेतील. चित्रपट अवतार २ वर नजर टाकली तर बजेट २००० कोटी आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग मध्येदेखील बाजी मारली आहे.

आतापर्यंत अवतार २ चे पाच लाख तिकिट विक्री झाली आहे. हेदेखील अंदाज लावला जात आहे की, रिलीजच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट जगभरात जवळपास १८० मिलियन डॉलर (१४०० कोटी) ची कमाई करेल. हा चित्रपट जगभरात ५२ हजार स्क्रीन्स आणि भारतात ३ हजार स्क्रीन्सवर रिलीज केला जाईल.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news