Critics Choice Awards 2023 : क्रिटिक्स ॲवॉर्डमध्ये आरआरआरला ५ नामांकने | पुढारी

Critics Choice Awards 2023 : क्रिटिक्स ॲवॉर्डमध्ये आरआरआरला ५ नामांकने

पुढारी ऑनलाईन डेस्क : एस एस राजामौली यांचा सुपरहिट चित्रपट आरआरआरची सध्या चर्चा होताना दिसत आहे. गोल्डन ग्लोब ॲवॉर्डनंतर आरआरआर चित्रपटाला क्रिटिक्स ॲवॉर्ड २०२३ मध्ये पाच नामांकने मिळाली आहेत. (Critics Choice Awards 2023 ) ज्यु, एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन एस एस राजामौली यांनी केलं आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक एस एस राजामौली, सर्वोत्कृष्ट परकीय भाषेतील चित्रपट, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट आणि सर्वोत्कृष्ट गाणे नाटू नाटूचा नामांकनात समावेश आहे. (Critics Choice Awards 2023 )

सोशल मीडियावर अधिकृत अकाऊंटवर आरआरआरचे मेकर्सनी या आनंदाचे वृत्त जाहीर करत कॅप्शन लिहिली आहे की- एक दिवस, एक मोठा मैलाचा दगड आरआरआरसाठी. #RRRmovie ला पाच विभागामध्ये Critics Choice awards!! चे नामांकन मिळाले.”

आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही मुख्य भूमिका या चित्रपटात होत्या. हे वृत्त पाहिल्यानंतर बॉलिवूड दिवा आलिया भट्टने इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत “WOW WOW!” अशी कॅप्शन लिहिलीय.

RRR गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या शर्यतीत

याआधी या चित्रपटाला आगामी गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या (Golden Globe Awards 2023) दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. बेस्ट पिक्चर (नॉन इंग्लिश) आणि बेस्ट ओरिजनल साँग (मोशन पिक्चर) या दोन विभागात चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. आपल्या चित्रपटाची दखल घेतल्याबद्दल राजामौली यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कार आयोजित करणाऱ्या हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनचे (HFPA) आभार मानले. HFPA ने बेस्ट पिक्चर (नॉन इंग्लिश) आणि बेस्ट ओरिजनल साँग (मोशन पिक्चर) श्रेणींमध्ये ‘RRR’ला नामांकित केले आहे.

RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याची स्पर्धा आता ‘व्हेअर द क्रॉडॅड्स’मधील ‘कॅरोलिना, ‘गिलेर्मो डेल टोरोज पिनोचियो’मधील ‘सियाओ पापा’, ‘टॉप गन मॅव्हरिक’मधील ‘होल्ड माय हँड’ आणि ‘ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरएव्हर’मधील ‘लिफ्ट मी अप’ या गाण्यांशी आहे.

नामांकनाच्या घोषणेनंतर राजामौली यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. “#RRRMovie ला दोन श्रेणींमध्ये नामांकित केल्याबद्दल @goldenglobes येथील ज्युरीचे आभार. संपूर्ण टीमचे अभिनंदन…तुम्ही दाखवलेले प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्व चाहते आणि प्रेक्षकांचे आभार 🤗🤗🤗.” असे राजामौली यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Back to top button