बिग बॉस मराठी -4 : तुझी स्ट्रॅटेजी चुलीत घाल – अमृता भडकली | पुढारी

बिग बॉस मराठी -4 : तुझी स्ट्रॅटेजी चुलीत घाल - अमृता भडकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात अमृता धोंगडे आणि विकास टास्कविषयी चर्चा होताना दिसणार आहे. अमृता विकासला म्हणाली, तू उभं राहून गोळा करत होतास, उभं राहून… तू नाही तर काय माझं भूत? विकास म्हणाला, नीट बघ कॅमेरामध्ये कळेल तुला. किरण माने म्हणाले, आम्हाला वाटलं तुला गुडघ्यावर बसता येत नाही. विकास म्हणाला, कसं बसता येईल ? जाळी डोक्यावर लागते. कसं बसणार मी ? किरण माने म्हणाले, तुला गुडघ्यावर बसता नाही येत का ? नसेल येत तर ठीक आहे. विकास म्हणाला, माझी स्ट्रॅटेजी ती सुरु आहे मी काय करु, माझी स्ट्रॅटेजी तीच होती तिथे. अमृता म्हणाली, अरे बापरे स्ट्रॅटेजी…चुलीत घाल तुझी स्ट्रॅटेजी.

Back to top button