Most Search Asian Celeb : गुगलवर उर्फी जावेद सर्वाधिक सर्च, सारा-जान्हवी-कियारालाही टाकले मागे | पुढारी

Most Search Asian Celeb : गुगलवर उर्फी जावेद सर्वाधिक सर्च, सारा-जान्हवी-कियारालाही टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री मॅाडल उर्फी जावेद कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत राहते. उर्फी (Most Search Asian Celeb) तिच्या आऊटफिट्स फॅशनमुळे चर्चेत असते. आपल्या अतरंगी फॅशन सेन्समुळे उर्फीला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. पण, विचित्र कपड्यांमुळे उर्फीला नेहमी ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.उर्फीने याच फॅशन सेन्समुळे बोल्ड आणि अतरंगी स्टाईलमुळे प्रचंड फॅन फॉलोईंग मिळवले आहेत. (Most Search Asian Celeb)

सोशल मीडियावर उर्फीची प्रत्येक पोस्ट काही मिनिटांत व्हायरल होते. एका रिपोर्टनुसार, सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने अनेक बॉलिवूड सुंदरींना मागे टाकत एक नवा विक्रम रचला आहे. उर्फीने केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.

गुगलने २०२२ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या आशियाई लोकांची यादी जाहीर केली आहे. शेअर केलेल्या यादीत बॉलिवूडपासून ते साऊथच्या सुपरस्टार्सपर्यंत कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. खास बाब म्हणजे उर्फी जावेदचे नावही या यादीत सामील आहे. उर्फीने केवळ या यादीत स्थान मिळवले नाही तर दक्षिण आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे. याआधी उर्फी जावेदने या यादीत ५३ व्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले होते.

गुगलने २०२२ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत अनुष्का शर्माचे नाव ५० व्या क्रमांकावर आहे, तर कियारा अडवाणीचे नाव ६० व्या क्रमांकावर आहे. याशिवाय उर्फी जावेद ही आता जॅकलीन फर्नांडिस, अनुष्का शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, शिल्पा शेट्टी, जान्हवी कपूर, क्रिती सेनन, सारा अली खान, दिशा पटनी यांना मागे टाकून ४३ व्या क्रमांकावर आहे. उर्फीने बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि आरआरआर फेम ज्युनियर एनटीआर आणि रणवीर सिंह यांसारख्या सुपरस्टार्सनाही मागे टाकले आहे.

हेही वाचा :

Back to top button