पुढारी ऑनलाईन डेस्क : आज घरात अमृता धोंगडे विकासला विचारताना दिसणार आहे, विकास तू सांग. अमृता म्हणाली, तू होतास ना तिथे तू सांग कि मी कधी नाव घेतलं की आपण अक्षय, अपूर्वाला काढायचं. असं मला firmly सांगायचं… हो मी नावं घेतलेलं असं सांग. दाद्याच्या मागे करू नकोस.
विकास म्हणाला, दाद्या बोला. किरण माने म्हणाले, विश्वासघातकी मुलीबरोबर मला बोलायचं नाही… दुतोंडी आणि विश्वासघातकी. अमृता धोंगडे त्यावर म्हणाली, मला तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाशी बोलायचे नाही. खोटारडा माणूस एक नंबरचा.
किरण माने म्हणाले, विश्वासघातकी पोरगी. असल्या पोरीशी काय बोलतो आहेस, मला नाही बोलायचं. अमृता म्हणाली, निघा मग. किरण माने यांनी बोलावताच विकास पण निघाला. त्यावर अमृता म्हणाली, तू पण जा हेच करत आला आहेस… पळपुटे… आता हा वाद नक्की का झाला ? कोणावरून झाला ? आणि का सुरु झाला ? हे आजच्या भागामध्ये कळेलच.