‘माझी तुझी रेशीमगाठ’ : प्रार्थना-मायराचा कोळी गाण्यावर भन्नाट डान्स पाहाच

‘माझी तुझी रेशीमगाठ’ : प्रार्थना-मायराचा कोळी गाण्यावर भन्नाट डान्स पाहाच
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर गेल्या २३ ऑगस्ट २०२१ पासून 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेते श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सध्या मायराचा एक हटके गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर झाला आहे.

या मालिकेतील खास म्हणजे, चिमुरडीच्या भूमिकेत असणारी (छोटीशी परी) मायरा वैकुळ होय. मालिकेतील मायराने श्रेयशला कमवतो किती? हा प्रश्न विचारताच ती खूपच चर्चेत आली.

मायराने केला 'मी हाय कोळी' गाण्यावर डान्स

मायरा नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या असाच एक मायराचा हटके डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात मायराने 'मी हाय कोळी' गाण्यावर ताल धरला आहे. यात तिला साथ प्रार्थना बेहरे हिने दिली आहे.

या व्हिडिओत मायरा गुलाबी रंगाच्या नऊवारीमध्ये दिसत आहे. या वेशभुषेत ती खूपच क्यूट आणि ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत प्रार्थनाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यानी कॉमेंन्सटचा पाऊस पाडला आहे. यासोबत चाहत्यांनी प्रेमाचा ईमोजीदेखील शेअर केला आहे.

याआधी ही मायराने आपल्या खऱ्या आई-वडिलांसोबत पारंपारिक वेषभूषेत फोटोशूट केले होते. यात मायरा गुलाबी रंगाच्या पोलक्यात (घागरा चोली) खूपच क्यूट दिसत होती.

मायराच्या मायरा कॉर्नर या यूट्युब चॅनलचे आतापर्यंत ९९.८ हजार सबस्क्रायबर झाले आहेत. काही दिवसातच ती एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करणार आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका चाहत्याच्या घरांघरात पोहोचत आहे.

हेही वाचलंत का? 

(VIDEO, PHOTO : _world_of_myra_official वरून साभार )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news