नाशिक पोलिस आयुक्तांनी दिला त्या पोलिस कर्मचाऱ्याला खांदा | पुढारी

नाशिक पोलिस आयुक्तांनी दिला त्या पोलिस कर्मचाऱ्याला खांदा

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक शहर पोलिस दलातील कर्मचारी प्रतीक विलास जाधव (३१, रा. आडगाव) यांचे निधन झाले. पोलिस प्रमुख या नात्याने नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी जाधव यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांच्या पार्थिवास खांदा दिला. पोलिस दल जाधव यांच्या कुटुंबियासोबत असल्याचा संदेश पाण्डे्य यांनी दिला.

दंगल नियंत्रण पथकातील पोलिस शिपाई प्रतीक जाधव यांचे हृदविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. तरुण सहकाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही बाब पोलिस आयुक्त पाण्डे्य यांना समजताच त्यांनी जाधव कुटुंबियांची भेट घेतली.

तसेच अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांनी जाधव यांच्या पार्थिवास खांदा दिला. यावेळी इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले होते. पोलिस दल कुटुंबियांसोबत असल्याचे सांगत जाधव कुटुंबियांना त्यांनी धीर दिला. अंत्यसंस्कार सपेपर्यंत सर्व पोलीस अधिकारी स्मशानभूमीत उपस्थित होते.

वरिष्ठ पोलिस अधिकारी शक्यतो ‘ऑर्डर’ देण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसते. मात्र पोलिस आयुक्तांच्या या कृतीमुळे पोलिसांच्या प्रत्येक सुख दु:खात अधिकारी सहभागी आहेत असा सकारात्मक संदेश पोलिस दलात गेला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button