Pinky Irani : मनी लाॅन्ड्रिंगप्रकरणी सुकेश चंद्रशेखरची निकटवर्ती पिंकी इराणीला अटक | पुढारी

Pinky Irani : मनी लाॅन्ड्रिंगप्रकरणी सुकेश चंद्रशेखरची निकटवर्ती पिंकी इराणीला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाठग सुकेश चंदशेखरच्या २०० कोटींच्या मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने  पिंकी इराणीला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पिंकी इराणीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होते. बुधवारी आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात तिची चौकशी करण्यात आली. यानंतर तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने पिंकीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी आहे.

कोण आहे पिंकी इराणी?

महाठग सुकेश चंद्रशेखर  याच्‍यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ओळख पिंकी इराणी करुन दिली होती. ती सुकेशची मॅनेजर होती. सुकेशने पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला गिफ्ट आणि पैसे दिले होते.याआधीही तिची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्‍हा अन्‍वेषण शाखेने तिची अनेकवे‍ळा चौकशी केली होती. नोरा फतेही-जॅकलीन फर्नांडिससोबत चौकशीदरम्यान पिंकी इराणीचं नाव अनेकवेळा समोर आलं होतं.

अँकर म्हणून काम करत होती पिंकी

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, पिंकी आधी एका टीव्ही शोमध्ये अँकर म्हणून काम करत होती. तिच्‍याविरोधात पुरावे मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली असून, न्‍यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button