Samantha Ruth Prabhu : सामंथा उपचारासाठी दक्षिण कोरियाला रवाना | पुढारी

Samantha Ruth Prabhu : सामंथा उपचारासाठी दक्षिण कोरियाला रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ने काही दिवसांपूर्वी फॅन्सना आपल्या आरोग्याची अपडेट दिली होती. तिने खुलासा केला होता की, ती मायोसिटिस (Myositis) नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे. (Samantha Ruth Prabhu) आजारपणात ती कशा प्रकारे स्वत:ला सावरत आहे, हेदेखील तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता मायोसिटिसचे ॲडव्हान्स उपचारासाठी ती साऊथ कोरियाला रवाना झाली आहे. (Samantha Ruth Prabhu)

ऑक्टोबरमध्ये सामंथा रुथ प्रभूने आपल्या आजाराबद्दल माहिती देत म्हटलं होतं की- तिने काही दिवसांपासून मायोसिटिसवर उपचार घेतले आहेत. पण, रिकव्हरी खूप हळू आहे. दरम्यान, ती आयुर्वेदिक उपचार घेत असल्याचीही माहिती समोर आलीय. आता उपचारासाठी साऊथ कोरियाला रवाना झाल्याचे वृत्त आहे. काही महिने ती साऊथ कोरियामध्ये राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

मायोसिटिस एक ऑटो इम्यून डिसीज आहे. यामध्ये पेशेंटला खूप थकवा येतो. मांसपेशी खूप दुखू लागतात. आणि ही स्थिती इतकी खराब होते की या आजाराने त्रस्त असलेल्या पेशंटना बसताना, जीना चढताना, ओझे उचलताना अडचणी येतात. काहीही काम न करता अशक्तपणा येतो. अनेकदा या परिस्थितीत पेशंट डिप्रेशनचा बळीही ठरु शकतो.

सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) शेवटी ‘यशोदा’ (Yashoda) मध्ये दिसली होती. तिच्याकडे सध्या ‘शाकुंतलम’, ‘कुशी’ आणि ‘गढ’ चित्रपट आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button