Kajol Devgan : काजोलने सोडले मौन, म्हणाली.... | पुढारी

Kajol Devgan : काजोलने सोडले मौन, म्हणाली....

अजय देवगण आणि काजोलची कन्या न्यासा ही नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या फोटोंमुळे, तिने केलेल्या पोस्टस्मुळे ट्रोल केले जाते. आता यावर काजोलने मौन सोडले आहे. काही दिवसांपूर्वी न्यासाचा बदललेला लूक समोर आला होता. तो लूक पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. काहींनी तिचे कौतुक केले, तर काहींनी तिला ट्रोल केले. लेकीला ट्रोल केल्यानंतर काजोलला दुःख होते; पण ट्रोलिंग आता सोशल मीडियाचा एक भाग बनला आहे, असे तिचे मत आहे. न्यासाला कोणी ट्रोल केले, तर मला नक्कीच वाईट वाटते. तिच्यावर केल्या जाणार्‍या ट्रोलिंगवर आतापर्यंत जितक्या बातम्या आल्या आहेत, त्या सर्व मी वाचल्या आहेत; पण या सगळ्याची सकारात्मक बाजू बघायची असे मी तिला नेहमी सांगत असते, असे काजोल म्हणाली.

हेही वाचा

Back to top button