Nora Fatehi : फिफामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर नोराचं हटके फोटोशूट (video) | पुढारी

Nora Fatehi : फिफामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर नोराचं हटके फोटोशूट (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) गेल्या काही दिवसांपूर्वी गुरू रंधावासोबतच्या ‘नाच मेरी राणी’ या हिंदी गाण्यातून चर्चेत आली होती. यासोबत तिच्या नवनवीन फॅशन सेन्सने सोशल मीडियावर सक्रिय असते. नोरा नुकतीच फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2022) च्या मंचावर पोहोचली होती. तिथे तिने डान्सचा धुरळा उडविला. याच दरम्यानच्या तिच्या हटके फोटोशूटनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) नुकताच फिफा वर्ल्ड कपच्या सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्स केला आहे. खास करून या सोहळ्यात तिच्या धमाकेदार डान्ससोबत तिच्या ड्रेसवर चाहत्याच्या नजरा खिळल्या. हा ड्रेस नोराने फॅशन डिझायनर फाल्गुनी शेन अँड पीकॉक यांच्या कलेक्शनमधून निवडला होता. ट्रान्सपरंट आउटफिटसोबत तिने गुलाबी रंगाच्या बलून श्रग कॅरी केला होता. मोकळे केस, हेवी मेकअप, सिल्वर पम्पस, पिंक हाय हिल्स आणि गुलाबी लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

संबंधित बातम्या

विशेष म्हणजे, नोराच्या या आउटफिटवर गळ्यापासून ते पायापर्यंत सिल्व्हर दिसून असून यात तिचा किलर लूक पाहायला मिळाला. हे फोटो नोराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘The category is Glam 🔥’. लिहिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक करत तिच्यावर कमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

‘Woahhh 💖’, ‘Gorgeous 🥰💝’, ‘Stunning!! And congratulations!!💕🔥🙌🏼’, ‘always support❤️🔥’, ‘Aap ki performance ke badle laal chaddar mili h’, ‘Wooaahhhhhhhhhh..,…..😍😍😍’, ‘So cute mam❤️❤️’, ‘Hayee garmiii🔥🔥🔥’, ‘Prettiest!😍❤️’, ‘Stunning 😍🔥❤️’, ‘Our beautiful Queen 😍❤️’, ‘Pink peacock 🦚’, ‘Oh wow very cute 🥰’, ‘OMG😍🔥’, ‘Uffffff!!🙌🔥🔥’, ‘Stunning! 💗’, यासारख्या कॉमेटस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास दिड लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.

हेही वाचलंत का? 

(video : norafatehi.fc and photo : norafatehi instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi.fc)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

Back to top button