विजय देवरकोंडाला 'लायगर' करणं पडलं भारी, ED कडून १२ तास चौकशी | पुढारी

विजय देवरकोंडाला 'लायगर' करणं पडलं भारी, ED कडून १२ तास चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) लायगर चित्रपटामुळे अडचणीत आलाय. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर फारसा चालला नाही. पण, आता मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने विजयची तब्बल १२ तास चौकशी केली आहे. रिपोर्टनुसार, हैदराबादमध्ये ईडी ऑफिसच्या समोर हजर झाला होता. ईडीला माहिती मिळाली होती की, चित्रपटामध्ये हवालाच्या पैशांसहित परदेशी फंडिंगची गुंतवणूक करण्यात आली होती. यानंतर ईडीने विजयची तब्बल १२ तास चौकशी केली.

विजय देवरकोंडाने आपल्या चौकशीनंतर मीडियाला सांगितलं की, हा एक अनुभव आहे. हे जीवन आहे. जेव्हा मला बोलावण्यात आलं तेव्हा मी माझी ड्यूटी साकारली. मी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.’ जेव्हा विजय विचारलं की त्याला पुन्हा बोलावण्यात येईल का, तेव्हा त्याने “नाही” असं उत्तर दिलं.

‘लायगर’ चित्रपट इन्वेस्टर्स आणि फंडवरून संशयित माहिती मिळतेय. चित्रपटाचे दिगेदर्शक पुरी जगन्नाथ आणि त्यांची बिझनेस पार्टनर चार्मी कौर यांचीदेखील ईडीने १२ तास चौकशी केली होती. संशयित पद्धतीने गुंतवणूक केल्यानंतर काँग्रेस नेते बक्का जुडसन (Congress Leader Becca Judson) ने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईडीने संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला. बक्का जुडसनने आपल्या तक्रारमध्ये म्हटलं होतं की, ‘लायगर’मध्ये अनेक राजकारण्यांनीही पैसे लावले होते. त्याचबरोबर त्यांनी हा देखील दावा केला होता की, काळा पैसा गुंतवण्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे.

Back to top button