Jadeja shares video : रवींद्र जडेजाने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ," नरेंद्र मोदी गया, गुजरात गया..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. आज ( दि. १ ) राज्यात पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघात मतदान होत आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा निवडणूक लढवत आहे. तिच्याच प्रचारासाठी जडेजानेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. ( Jadeja shares video )
रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा उत्तरी जामनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आहेत. आज मतदान सुरु होण्यापूर्वी काही तास आधी जडेजाने भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणारा बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Jadeja shares video : काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे ?
या वेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, “मेरा कहना इतना यही है की, नरेंद्र मोदी गया गुजरात गया, हे माझं वाक्य आहे. जर तुम्ही नरेंद्र मोदी यांना बाजूला केलं तर तुमचा गुजरात गेला. हे माझं वाक्य आहे. हे मी अडवणी यांच्या जवळही बोललो आहे.”
गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघात मतदान होत आहे. ७८८ उमदेवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा यांचाही समावेश आहे. जामनगर उत्तर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. २०१७ विधानसभा निवडणुकीत येथे भाजपचे धर्मेंद्र सिंह जडेजा आमदार होते. मात्र यंदा भाजपने रवींद्र जडेजाच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.
Abhi bhi time hai samaj jao gujaratiyo🙏🏻 #respect #balasahebthackeray pic.twitter.com/bwjO3Jj7iq
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 30, 2022
हेही वाचा :
- Passport and Rules : पासपोर्ट काढायचाय? ‘ही’ माहिती जाणून घेणे ठरते आवश्यक
- Shraddha murder case : नार्को टेस्टसाठी आफताबला तिहारमधून रुग्णालयात आणले…
- Weight Loss Tips : एका महिन्यात वजन कमी करायचं; मग ही ‘सात’ काम कराच