रंग माझा वेगळा : दीपाच्या संसारात बिब्बा घालणारी आयेशा आहे तरी कोण?

रंग माझा वेगळा : दीपाच्या संसारात बिब्बा घालणारी आयेशा आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रंग माझा वेगळा या मालिकेत धक्कादायक वळण दिसतेय. कार्तिकने कुणाच्याही परवानगीशिवाय आयेशाशी लग्न केलंय. दीपाला याची कुणकुण लागल्यानंतर ती आपलं कुंकू वाचवण्यासाठी धावते. पण, ती काहीचं करू शकत नाहीये. कार्तिकची आई सौंदर्यादेखील आपल्या मुलाला दुसंर लग्न करण्यापासून रोखू शकत नाहीये. तुम्हाला माहितेय का, आयेशा हे पात्र साकारणारी अभिनेत्री नक्की कोण आहे? आयेशा हे पात्र साकारणारी अभिनेत्री आहे-विदिशा म्हसकर. अभिनेत्री विदिशा म्हसकर हिच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

कार्तिक आणि आयेशा
कार्तिक आणि आयेशा

आयेशा ही कार्तिकच्या मागे लागते. दीपा ही कार्तिकची पहिली बायको आहे. हे माहित असतानाही आयेशा कार्तिकला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. कार्तिक आयेशाशी लग्न करण्याचा निर्णय घेतो.

जेव्हा ही गोष्ट सौंदर्याला समजते. तेव्हा ती या लग्नाला परवानगी देत नाही. पण, कार्तिक आपल्या आईला सौंदर्याला म्हणतो-आयेशाने त्याच्या दु:खाच्या काळात खूप साथ दिली आहे. त्यामुळे तो आयेशासोबतचं लग्न करणार. पण, सौंदर्या लग्नाला नकार देते. ही गोष्ट दीपाला समजेत. पण, दुर्दैवाने ती काही करू शकत नाही.

मराठमोळी अभिनेत्री आयेशा

विदिशा ही प्रसिध्द मराठी टीव्ही अभिनेत्री आहे. तिने हे मन बावरे या मराठी टीव्ही मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले होते. हे मन बावरे मध्ये तिने सान्वी हे पात्र साकारले होत. या पात्रामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

याशिवाय ती अनेक मराठी मालिकांमध्ये दिसली. ती फुलराणी, बन मस्का यासारख्या मालिकांमध्ये तिचा अभिनय पाहायला मिळाला.
दहा बाय दहा या नाटकात तिने अभिनय केला.

यामध्ये तिचा अभिनेते विजय पाटकर यांच्यासोबत अभिनय होता. तसेच प्रथमेश परब आणि सुप्रिया पाठारे यांच्यादेखील भूमिका होत्या.

झी मराठीचा बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा पुरस्कार तिला मिळालाय.

पुरामुळे कोकणात अडकली होती अभिनेत्री

ती पुरामुळे कोकणात अडकली होती. यावेळी तिने कोकणवासियांचे होत असलेले हाल पाहून मदतीसाठी हात पुढे केला होता. ती महाड इथे अडकली होती. मुसळधार पावसामुळे कोकणातल्या नद्यांना पूर आला होता.

यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली होती. ही सगळी परिस्थिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणली होती. इन्स्टाग्राम स्टोरीवरून तिने व्हिडिओ शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news