Sai Lokur Dubai Travel: सईची दुबईवारी, रिल्स बनवून दिल्या ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा

sai lokur
sai lokur

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री सई लोकूरची दुबईवारी सुरू आहे, आपल्या पतीसोबत ती परदेशात आनंदाचे क्षण घालवतेय. तिने खूप सुंदर असे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले असून तिने दुबईतून रिल्स बनवले आहेत. हे रिल्स (Sai Lokur Dubai Travel) पाहण्यासारखे आहेत. सईने काही फोटोदोखील अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये ती वाळवंटात उभी असलेली दिसते. काही फोटोंमध्ये ती आपल्या पतीसोबत पाठमोरी बसलेली दिसते. (Sai Lokur Dubai Travel)

सईने दुबईतून काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा वनपीस परिधान केलाय. पांढऱ्या रंगाची बॉर्डर असलेला गॉगलदेखील घातला आहे. तिच्या एका हातावर पक्षी बसलेला दिसतोय. दुसऱ्या फोटमध्ये ती तिचा पती आणि अन्य फ्रेंड्ससोबत दिसतेय. एका रिलमध्ये ती वाळूत बसली असून खेळताना दिसतेय. रिल्स शेअर करताना तिने Happy me ❤ अशी कॅप्शन लिहिलीय. आणखी काही फोटोंमध्ये ती आणि तिचा पार्यनर सनसेट पाहत वाळूत पाठमोरे बसलेले दिसतात. आणखी काही फोटोंमध्ये हे दोघे गाडीजवळ दिसतात. मित्रांसोबतचे फोटो अपलोड करताना तिने लिहिलंय-Squad goals.

सईने फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने म्हटलंय- Happy 2nd My Love ❤ & to many more…#anniversary #happyanniversary #anniversaryspecial.

हे फोटोज पाहून चाहते सईला हॅप्पी मॅरीज ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोतील प्रत्येक पोझ चाहत्यांच्या पसंतीला उतरतेय. सईने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. सई बिग बॉस मराठी शोमध्ये देखील दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news