

न्यूयॉर्क : सोमालियामध्ये सापडलेल्या एका मोठ्या उल्केत आता पृथ्वीवर कधीही न आढळलेली दोन अनोखी खनिजे आढळून आली आहेत. त्यांच्या अध्ययनावरून लघुग्रहांच्या संरचनेविषयी जाणून घेण्यास मदत मिळू शकते.
तब्बल 16.5 टन वजनाच्या उल्केतील 70 ग्रॅम वजनाचा एक हिस्सा अध्ययनासाठी घेण्यात आला होता. ही उल्का 2020 मध्ये कोसळली होती. त्यामध्ये ही आतापर्यंत अज्ञात असलेली खनिजे सापडली आहेत. त्यांना संशोधकांनी 'एलालाईट' असे नाव दिले आहे.
अल्बर्टा युनिव्हर्सिटीतील ख्रिस हर्ड यांनी सांगितले की, एखाद्या शिळेत नवी खनिजे सापडतात त्यावेळी ही शिळा आतापर्यंत सापडलेल्या अशा शिळांपेक्षा वेगळी ठरते. या शिळेबाबतही असेच घडले आहे. तिच्यामध्ये विज्ञानाला माहिती नसलेली दोन नवी खनिजे आढळून आली आहेत. ही उल्का 'आयर्न आयएबी कॉम्प्लेक्स मेटेरॉईट' प्रकारातील आहे. त्यामध्ये लोह आणि सिलिकेटस्चे सूक्ष्म भाग असतात.