दिलीप कुमार यांची बहीण रुग्णालयात दाखल, देखभालीसाठी पोहोचल्या सायरा बानो

सायरा बानो
सायरा बानो
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची धाकटी बहिण फरीदा यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. दरम्‍यान, त्‍याच्‍या  दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो आणि दिलीप कुमार यांचा पुतण्या साकिब देखभालीसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. मात्र, याबाबत कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती  जारी करण्यात आलेले नाही.

एका रिपोर्टनुसार, फरीदा यांची तब्येत बिघडली होती.  त्‍यांच्‍यावर मागील ७ दिवसांपासून कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्‍यांची देखभाल दिलीपकुमार यांच्‍या  पत्नी सायरा बानो आणि दिलीप कुमार यांचा पुतण्या साकिब घेत आहेत.

सायरा बानो यांची प्रकृतीही ठीक नसल्याने त्या अनेकदा कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये जात असताना स्पॉट होतात. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी ज्वार भाटा, सगीना आणि बैरागसह अन्य चित्रपटांमध्ये काम केले होते. दिलीप कुमार यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news