कीव्ह : रशियाविरोधात युद्ध सुरू असताना लाखो युक्रेनवासीयांना या वर्षी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. 271 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या ऊर्जा समस्येमुळे, थंडीमुळे लाखो लोकांचा जीव जाण्याची भीती व्यक्त केली आहे. गेल्या काही आठवड्यांत रशियाने युक्रेनची वीज केंद्रे उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे विजेची समस्या निर्माण झाली आहे. सद्या युक्रेनमधील लाखो घरामध्ये वीजेचा पुरवठा होत नसल्याने त्यांना अंधारातच दिवस घालवावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.