Bhumi Pednekar : भूमीची प्लास्टिक सर्जरी? नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा पाऊस | पुढारी

Bhumi Pednekar : भूमीची प्लास्टिक सर्जरी? नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड उद्योग जगतात असे अनेक सेलिब्रिटीज आहेत, ज्यांनी आपला चेहरामोहरा बदलला आहे. अनेकांनी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेत आपल्या चेहऱ्याची, गालांची, ओठांची सर्जरी केलेली असते. आता सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिचादेखील समावेश झाला आहे. पण, तिच्या नवा लूक पाहताच नेचकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. भूमीला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. (Bhumi Pednekar)

मीडिया रिपोर्टनुसार, भूमीने फेस सर्जरी केलीय. चेहऱ्यावर सर्जरी केल्यानंतर तिचा नवा लूक व्हायरल होतोय. पण, यानंतर मात्र ती सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आलीय.

गोविंदा नाम मेरा फेम अभिनेत्री भूमीचा एक फोटो रेडिटवर शेअर करण्यात आला होता. तिची सस्ती आयेशा टाकिया म्हणत ट्रोल केलं जात आहे. भूमीने केलेली तथाकथित कॉस्मेटिक सर्जरी पाहून नेचकऱ्यांनी तिला ट्रोल केले.

एका युजरने जान्हवी कपूरशी तुलना केली. त्याने लिहिलं, “पहिल्या नजरेत जान्हवी सारखी दिसत आहे” एका अन्य युजरने लिहिलं, “यार ती दम लगा के हईशामध्ये खूप छान दिसत होती..”

दुसऱ्या युजरने भूमीची तुलना कार्दशियन बहिणीशी केली. त्याने लिहिलं की, “द क्लो कार्दशियन पाउट.अजिबात चांगलं नाही!” एका अन्य निराश .युजरने टिप्पणी केली, “भूमीला आपल्या नव्या ओठांसोबत पोज देणं बंद केलं पाहिजे आणि तोंड उघडून पोज देणं बंद करायला हवं.

भूमी पेडणेकरने खरंच सर्जरी केली आहे किंवा नाही, याची अधिकृत पुष्टी होणं अद्याप बाकी आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झालं तर विक्की कौशल-भूमी पेडनेकर गोविंदा नाम मेरा नावाच्या एका कौटुंबिक ड्रामामध्ये ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारतील. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌏 (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌏 (@bhumipednekar)

Back to top button