Shweta Shinde : श्वेता शिंदे झाली बोल्ड, ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट | पुढारी

Shweta Shinde : श्वेता शिंदे झाली बोल्ड, ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी टीव्ही निर्माती श्वेता शिंदे हिने सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकले आहे. श्वेता शिंदे (Shweta Shinde ) एक सुंदर अभिनेत्री असण्याबरोबरचं एक उत्तम टीव्ही मालिका निर्मातीदेखील आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपट केले आहेत. ती ‘लागीरं झालं जी’ आणि ‘डॉक्टर डॉन’ या मालिकांसाठी ओळखली जाते. तर तिची ‘देवमाणूस’ सारखी टीव्ही मालिका प्रचंड गाजली. तिने आतापर्यंत अनेक मालिकांची निर्माती केलीय. आता तिची आगीमी मालिका शेतकरीच नवरा हवा येतेय. त्यापुर्वी श्वेताने आपले अप्रतिम फोटोशूट केलंय. (Shweta Shinde)

व्हाईट कलरच्या रंगबेरंगी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये श्वेताने आपले फोटोशूट केलं आहे. कधी झाडाजवळ उभारून तर कधी मोकळे केस सोडून तिने फोटोसाठी पोजेस दिल्या आहेत. हे फोटो शेअर करताना तिने Lost in the woods.🤍 अशी कॅप्शन लिहिलीय.

तिच्या बोल्ड अदा पाहून चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोय. लाईट मेकअप, पिंक लिपस्टीक, मोकळे केस आणि तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी सर्वांना वेड लावलं आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला असून हार्ट आणि फायर 🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🔥🔥🔥❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️ इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये तिला सौंदर्याची खाण म्हटलं आहे. अनेकांनी लव्ह ❤️😍🔥, Awesome 🔥इमोजी शेअर केले आहेत.

‘अप्पी आमची कलेक्टर’ची निर्मिती

या मालिकेची निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे आहे. या मालिकेत अपर्णा सुरेश माने हिने अप्पीची भूमिका साकारलीय. तसेच या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईकने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले आहे. या मालिकेचे शूटिंग साताऱ्यामधील आसगावात झाले आहे.

Back to top button