पुढारी ऑनलाईन डेस्क : वजनदार सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी प्रिया बापट (priya bapat ) आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेतेय. ती जिममध्ये तासनतास घाम गाळतेय. ती कशाप्रकारे आपल्या बिझी शेड्यूलमधून आपला फिटनेस ठेवते, जाणून घेऊया. एक गुणी अभिनेत्री म्हणून प्रियाची ओळख आहे. ती सोशल मीडियावरदेखील खूप ॲक्टिव्ह असते. तिचे हटके फॅशन सेन्स तर हटके आहेत. ती नेहमीच चाहत्यांसाठी आपले वेगवेगळे फोटोज, व्हिडिओज शेअर करत असते. आतादेखील तिने नवा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. (priya bapat )
प्रियाने जिममधील वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये ती हार्ड वर्कआऊट करताना दिसते. आपल्या फिटनेसबाबक प्रिया खूप जागरुक असते. ती आपला फिटनेस ठेवण्यासाठी काय काय करते पहा. तिने व्यायाम करतानाचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअऱ केसा आहे.
ती नेहमी फिटनेस गोल देत असते. आपल्या व्यायामाचे फोटो शेअर करत असते. तिचे फिटनेस प्रेम पाहून चाहतेही तिचं भरभरून कौतुक करतात.
लॉकडाऊनमध्ये प्रियाने अपार मेहनत घेऊऩ आपले वजन कमी केले होते. तिने आपल्या इमारतीचे जिने चढ-उतार केले होते. प्रियने जॉगिंगला पसंती दिली आहे. आऊटडोर वर्कआऊटमुळे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती राहते, असे ती सांगते, रिडींग करणं, दोरीवरच्या उड्या मारणं वगैरे व्यायम ती करते.
मध्यंतरी, तिने एक फोटो शेअर केला होता. ती जिम वर्कआऊटचा ड्रेस घालून बसलेली दिसत होती. तसेत तिने दोरीवरच्या उड्या मारतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय-"आपल्या शरीरावर प्रेम करा! त्याची चांगल्या पध्दतीने देखभाल करा. आपल्या बिझी कार्यक्रमातदेखील हे निश्चित करा की, तुम्हाला आरोग्यासाठी एक तास द्यायचा आहे. जिम जा, होम वर्कआउट करा किंवा केवळ फिरायला जा. तुम्ही जिथे जाल, केवळ स्वत:साठी एक तास द्या आणि जिम जा. पळा, पोहायला जा. आपल्या शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी काहीतरी हालचाल करा.