हृतिक रोशन-सबा आझादचे डेटिंग नाही, या तर केवळ अफवाचं | पुढारी

हृतिक रोशन-सबा आझादचे डेटिंग नाही, या तर केवळ अफवाचं

हृतिक रोशन सध्या सबा आझादला डेट करत आहे. कधी डिनर तर कधी बॉलीवूड पार्टी असे हे दोघे सध्या एकमेकांबरोबर दिसत असतात. दोघांच्या लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत असते. यावर आता हृतिकने मौन सोडले आहे. हृतिकने त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलवरून एक टि्वट करत लिव्ह इन रिलेशनशिपच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. अलीकडेच हृतिक आणि सबा लवकरच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचा दावा केला होता. एवढेच नाही तर त्यासाठी हृतिकने एक अपार्टमेंटही विकत घेतल्याचे सांगण्यात आले होते. या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली होती. त्यावर टि्वट करत हे सर्व रिपोर्ट केवळ अफवा असल्याचे हृतिकने म्हटले आहे. मी एक प्रसिद्ध व्यक्ती असल्याने माझ्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते हे मी समजू शकतो. पण या वृत्तामध्ये काहीही तथ्य नाही, असे त्याने म्हटले आहे.

Back to top button