अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? : खोडकर सुनेची-खट्याळ सासूची गोष्ट! | पुढारी

अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? : खोडकर सुनेची-खट्याळ सासूची गोष्ट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयुष्यात आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय किंवा आईला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय, एकदा मुलगी सून झाली की तिच्यासाठी आपली आई सासूच असते. सासूची आई होणं तसं दुरापास्तच. अशाच एका खोडकर सुनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱ्या खट्याळ मिश्किल सासूमधल्या नात्याची खुमासदार गोष्ट म्हणजे “अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई” आजच्या आधुनिक काळात, सासू सूनेमधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं, याचा धमाल प्रवास यात बघायला मिळेल. “तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना” असं हे दोघींमधील नातं वेगेवगळ्या प्रसंगातून धमाल उडवत असताना त्यांच्या सासू सुनेच्या नात्यावर सासऱ्यांची खुमासदार टिप्पणी त्या नात्याचे विविध पैलू उलगडून दाखवते. या मालिकेत खट्याळ सासूच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी असणार आहेत तर खोडकर सून साकारतेय स्वानंदी टिकेकर.

सासू सुनेच्या नात्यामध्ये येणारे तिढे विनोदी ढंगाने सोडवत हसत खेळत जगताना त्यांच्यातील नात्याची वीण घट्ट होत जाते. घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणांना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ही गोष्ट प्रेक्षकांना मिळवून देईल.

पाहायला विसरू नका “अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?” २१ नोव्हेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Back to top button