कंगनाने केले तब्बूचे कौतुक | पुढारी

कंगनाने केले तब्बूचे कौतुक

अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. कधी वादग्रस्त विधान करून ट्रोल होते तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मात्र नुकतीच तिने एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. अजय देवगणचा ‘द़ृश्यम 2’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात तब्बूही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. कंगनाने तब्बूसाठी एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या वर्षी फक्त दोन हिंदी चित्रपटांनी चांगले काम केले आहे, एक म्हणजे ‘भूलभुलैया 2’ आणि ‘द़ृश्यम 2’ या दोन्ही चित्रपटांत तब्बूने मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत ते देखील तिच्या 50 वर्षी. तिने स्वतःच्या जोरावर हिंदी चित्रपट चालवले आहेत. तिची प्रतिभा आणि सातत्य यावर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नाही, परंतु तिचे सर्वोत्तम दिसणे आणि वयाच्या 50 वर्षी स्टारडमपर्यंत पोहोचणे हे कौतुकास्पद आहे. मला वाटते की महिलांना त्यांच्या समर्पणासाठी जास्त श्रेय मिळायला हवं, अशा शब्देंत कंगनाने भावना व्यक्त केल्या.

Back to top button