Deepika Padukone : शाहरुखची दीपिकासाठी खास पोस्ट, आजदेखील तुलाच...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान (Deepika Padukone) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) लवकरच चित्रपट पठान (Pathaan) मध्ये दिसणार आहेत. दोघांचा हा चौथा चित्रपट आहे. दरम्यान, दीपिका पादुकोणला इंडस्ट्रीत १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनेत्री दीपिकाने २००७ मध्ये शाहरुखसोबत ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा दिवस खास बनवण्यासाठी शाहरुखने दीपिकासोबतच्या त्यांच्या चित्रपटातील फोटोंचा कोलाज पोस्ट केला. या पोस्टवर दीपिका आणि रणवीरने कमेंट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दीपिका पादुकोणने शाहरुख खानसोबत चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयर सारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले. हे दोघे त्यांच्या आगामी ‘पठान’ या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर जादू निर्माण करणार आहेत. दरम्यान, ओम शांती ओमला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाहरुख खानने एक खास पोस्ट शेअर केली आहे. किंग खानने ४ फोटो असलेला एक कोलाज पोस्ट केला आहे. प्रत्येक फोटो त्याच्या चित्रपटाशी संबंधित आहे, म्हणजेच त्यात ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर आणि पठाण या चित्रपटातील फोटो आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये शाहरुखने दीपिकाचे खूप कौतुक केले आणि १५ ‘विलक्षण’ वर्षांचे क्षण आठवले. किंग खानने लिहिले की, ‘१५ वर्षांची सतत चांगली कामगिरी…. तुला पाहतो… तुला पाहतो… तुलाच पाहतो.. मी अजूनही तुझ्याकडेच पाहतोय.’
शाहरुख खानच्या या पोस्टवर चाहते मोकळेपणाने कमेंट करत आहेत. त्याचबरोबर दीपिका आणि रणवीर सिंग यांनीही या पोस्टवर कमेंट केली आहे. दीपिकाने प्रतिक्रिया देत लिहिले ‘शब्द आमचे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत’.
दीपिका पादुकोण-शाहरुख खान लवकरच चित्रपट पठानमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी, २०२३ ला चित्रपटगृहात रिलीज होईल.
- Marriage card : डिजिटल युगातही कागदी पत्रिकांचे महत्त्व टिकून
- World Population UN Report : १५ नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या ८ अब्ज, २०२३ मध्ये भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश
- नाशिक : वीजचोरी प्रकरणी आठ ग्राहकांना सव्वादोन लाखांचा दंड
View this post on Instagram