World Population UN Report : १५ नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या ८ अब्ज, २०२३ मध्ये भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश | पुढारी

World Population UN Report : १५ नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या ८ अब्ज, २०२३ मध्ये भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश

पुढारी ऑनलाईन: World Population UN Report : जागतिक लोकसंख्येचा दर २०२० पासून एक टक्क्याने कमी झाला असला तरी, संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार  नवीन माहिती समोर आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, २०८० पर्यंत जगाची लोकसंख्या ही शिखरावर पोहोचणार आहे. दरम्यान भारताची लोकसंख्या देखील २०२३ पर्यंत चीनपेक्षाही जास्त होणार आहे. यामुळे जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

World Population UN Report : युनाटेड नेशनने शुक्रवारी जारी केलेल्या अहवालानुसार, १५ नोव्हेंबर रोजी जगात ८ अब्जव्या मुलाचा जन्म होऊन, यासह जगाची लोकसंख्या ८ अब्ज होईल. लोकसंख्येच्या वाढीला जरी ब्रेक लागला असला तरी, त्यामध्ये दिवसेंदिवसे वाढ होताना दिसत आहे. जगाची लोकसंख्या ७ पासून ८ अब्जापर्यंत पोहचण्यासाठी १२ वर्षे लागली. परंतु हीच लोकसंख्या ९ अब्जापर्यंत पोहचण्यासाठी १५ वर्षे लागतील असेही या अहवालात म्हटले आहे.

World Population UN Report : संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या येत्या  १५ नोव्हेंबर नंतर ८ अब्जचा आकडा पार करेल. हा आकडा नक्कीच जगाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. ही लोकसंख्या अशीच वाढत (World Population) राहणार आहे. येत्या काही दशकात ही लोकसंख्या मंद गतीने वाढत राहील. लोकसंख्या वाढीत प्रादेशिक असामानता असेल. २०२३ पर्यंत ही संख्या ८.५ अब्जांपर्यंत पोहोचू शकते.

या कालखंडात वाढली जगाची लोकसंख्या (World Population UN Report) :

जागतिक महामारी कोरोनाचा सर्वच घटकांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे. अजूनही याचे परिणाम लोकांवर होत आहेत. या काळात लोकसंख्यावाढीवर खूप परिणाम झाल्याचे विविध अभ्यास सांगत आहेत. मृत्यूदरात घट झाल्याने २०५० साली सरासरी जागतिक दीर्घायुष्य साधारणत: ७७.२ वर्षे असेल असा अंदाज वर्तवला आहे. जगभर कोरोना विषाणूमुळे गर्भधारणा आणि जन्मदरावर परिणाम झाला. सारासर विचार करता १९५० ते २०२२ या कालखंडात जगाची लोकसंख्या तब्बल तीनपटीने वाढल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

Back to top button