National Bird Day : बर्ड मॅन ऑफ इंडिया – डाॅ. सलीम अली | पुढारी

National Bird Day : बर्ड मॅन ऑफ इंडिया - डाॅ. सलीम अली

पुढारी ऑनलाइन डेस्क : National Bird Day :  डॉ. सलीम अली, 12 नोव्हेंबर 1896 रोजी मुंबई येथे बोहरा कुटुंबात त्यांचा जन्‍म झाला. जन्‍मानंतर वर्षभरातच वडील मोईजुद्दीन यांचे निधन झाले आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी आई झिनत उल निस्सा यांचेही निधन झाले. ते अल्प वयातच अनाथ झाले. त्यांचा मुक्काम कधी मामाकडं तर कधी काकीकडं हलला.

National Bird Day : वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी छर्याच्या बंदुकीने एका चिमणीची शिकार केली. जेव्हा त्यांनी ती चिमणी उचलली तेव्हा तिचा कंठ पिवळा असल्याचे दिसले. हे काही तरी वेगळेच आहे हे लक्ष्यात आल्यावर कुतूहल पूर्वक त्यांनी ती चिमणी मामा amiruddin यांना दाखवली. हे मामा वाईल्‍ड लाईफ सोसायटी अन् बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटीचे सदस्य होते. मामा त्यांना घेऊन BNHS येथे घेऊन गेले तेथे तत्कालीन मानद सचिव W S मीलार्ड यांनी सलीम अलींचा इंटरेस्ट बघून त्यांना BNHS मधील पेंढा भरून ठेवलेले असंख्य पक्षी दाखवले. ते पाहून Salim Ali पूर्णपणे भारावून गेले.

National Bird Day : तो एक क्षण होता ज्यानं त्यांचं आख्खं आयुष्यच बदलवून टाकलं. त्यांना पक्ष्यांचा नादच लागला..इतका की त्यांनी आपलं पुढील सर्व आयुष्य पक्ष्यांसाठी वाहिलं. ते नेहमी BNHS येथे जाऊन अभ्यास करू लागले. शाळा पूर्ण झाल्यानंतर सलीम अली यांनी कॉलेज जॉईन केले परंतु डिग्री मिळण्यापूर्वी त्यांना भावाला मदत करण्यासाठी Burma आजच्या Myanmar ला जावे लागले. परंतु तेथे देखील ते पक्षी निरिक्षण मधेच गुंगून गेले. लवकरच ते तेथून परतले आणि त्यांनी शिक्षण पुढे चालू करून Zoology या विषयात 1918 साली डिग्री मिळवली. आणि 1923 साली त्यांनी Bombay Natural History Society मध्ये guide चि नोकरी पत्करली. तिथे ते visitors ना stuff करून ठेवलेले पक्षी दाखवत असत हे करत असताना त्यांचा जिवंत नैसर्गिक पक्ष्यां बाबतीत आणखीन वाढला.

सलीम अली मग जर्मनी ला गेले तेथे ते जागतिक दर्जाचे पक्षी तज्ञ डाॅ आयर्वीन स्टासमन ना भेटले. एका वर्षातच ते मुंबईत परतले.
ते पुन्हा BNHS मध्ये नोकरी करू लागले पण क्लार्क म्हणुन कारण पूर्वी ते ज्या पोस्ट वर होते ती पोस्ट आर्थिक कारणास्तव बंद करण्यात आली होती. या पोस्ट वर असताना त्यांना Kihim गावात त्यांच्या पत्नी च्या घरी रिसर्च करायला परवानगी मिळाली. ते घर एक निसर्गरम्य ठिकाण होते तेथे त्यांनी आपल्या जास्तीत जास्त वेळ weaver पक्ष्यांचा अभ्यास करण्यात घालवला. या अभ्यासावरून त्यांनी 1930 साली रिसर्च पेपर लिहिला ‘the nature and activities of the weaver bird’.

National Bird Day : दरम्यान त्यांचा विवाह तहमिना बेगम यांच्याशी झाला होता. त्यानंतर ते देशभरातील विविध जंगलं-डोंगर दऱ्या-रानोमाळ भटकले-भटकत राहिले.. त्यांनी पक्ष्यांच्या विविध प्रजाती,त्यांच्या सवयी, वैशिष्ट्ये,वैविध्य,निसर्गचक्र याबद्दल टिपणं काढली, नोंदी केल्या,अभ्यास केला अन् हळूहळू आपलं आख्खं आयुष्यच पक्ष्यांसाठी वाहून घेतलं. 1939 साली त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले. त्यांच्या देशभरातील पक्षी अभ्यास दौर्यातील नोंदी वरून त्यांनी 1941 साली The Book of Indian Birds हे पुस्तक प्रकाशित केले. जे भारतात एक लोकप्रिय पक्ष्यांचे पुस्तक आहे. यात त्यांनी पक्ष्यांच्या जवळपास १२०० प्रजाती आणि २१०० उपजातींची चित्रांसह शास्‍त्रशुद्ध माहिती देणारा मार्गदर्शक अशी माहिती लिहिली..

सलीम अलींनी S. Dillon Ripley या जगप्रसिद्ध पक्षितज्ञ सोबत 1964 ते 1974 अशी अखंड दहा वर्षे कार्य करून Handbook of the Birds of India and Pakistan’ (10 Volume Set) प्रकाशित केले. ज्यात भारतीय द्वीपकल्प मधील बहुतांश पक्ष्यांचे सखोल शारीरीक वर्णन, आढळस्थान, स्थलांतर, प्रजनन इ विषयी शास्त्र शुद्ध माहिती प्रसिद्ध केली.

National Bird Day : 1967 साली त्यांनी Common Birds हे भारतीय पक्षांचे field guide प्रकाशित केले आणि 1985 साली “The Fall of Sparrow” हे आपले आत्मचरित्र लिहिले. अर्थात हे सगळं अगदी सहजसोपं नव्हतं.. एखाद्या गोष्टीसाठी तहानभूक हरपून स्वत:ला पुर्णवेळ वाहून घेणं म्हणजे एक तपश्चर्याच असते.

अनेक संकटांवर मात करत त्यांनी या छंदाला जवळजवळ एक मोठी परंपराच बनवलं आणि संपूर्ण देशाला पक्ष्यांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनही दिला. हा अभ्यास म्हणजे केवळ ‘चिऊकाऊचा खेळ’ नव्हता यामागं त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी मोठा लढा दिला होता. “ताजमहाल नष्ट झाला तर पुन्‍हा बांधता येईल पण सायलंट व्‍हॅलीसारखं जंगल संपल्यास पुन्‍हा उभारता येणार नाही” अशी भूमिका घेत त्यांनी प्रसंगी सरकार विरुद्ध कठोर भूमिका आणि यंत्रणेविरुद्ध थेट लढाही दिला.

National Bird Day : तारीख – १९ एप्रिल १९७५ . स्थळ – दिल्ली येथील पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कार्यालय . इंदिरा गांधी नेहमीप्रमाणे आपल्या समोरचा पत्रव्यवहार वाचण्यात गढून गेल्या होत्या . एका ओळखीच्या हस्ताक्षराने त्यांचे लक्ष वेधले . ते हस्ताक्षर होते जगप्रसिद्ध पक्षितज्ञ सालीम आली यांचे . त्या पत्रात सालीम आली यांनी लिहिले होते ,”मुंबईतील बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून जाणारा महामार्ग बांधायचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे . हा महामार्ग बांधण्यासाठी उद्यानातील शेकडो झाडांची कत्तल करावी लागणार होती. “ त्यांनी त्यात पुढे म्हटले की हा महामार्ग न बांधण्याबाबत ते संबंधितांचे मन वळविण्यात अपयशी ठरले आहेत. आता ते अखेरचा उपाय म्हणून पंतप्रधानांना लिहित आहेत.

इंदिराजींनी आठच दिवसात हा विषय महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या निदर्शनास आणला. त्या म्हणाल्या, मुंबईसारख्या शहरात महामार्गाची गरज मी समजू शकते परंतु त्याचबरोबर शहरातील मोकळ्या जागा सुरक्षित ठेवण्याची तसेच वनउद्यानांची व अभयारण्यांचीही शहरासाठी तेवढीच गरज आहे.“ दि ३० एप्रिल १९७५ रोजी शंकरराव चव्हाण यांनी बोरीवली उद्यानातून महामार्ग काढायची योजना रद्द करत असल्याचे इंदिराजींना कळविले. जर त्यावेळी बोरीवली उद्यानाच्या गाभा क्षेत्रातून महामार्ग गेला असता. तर आज या उद्यानाची आणि तेथील वन्य प्राण्यांची काय अवस्था झाली असती याची कल्पनाच करवत नाही.

National Bird Day : पक्षी निरिक्षक मग तरुण बंडखोर पर्यावरणवादी असलेले ते एव्हाना ‘अभ्यासक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. संपूर्ण जग त्यांच्याकडं आदरानं बघू लागलं. ‘पक्षी’ म्हटलं की त्याचं नाव जणू समानार्थी असावं इतकं एकरूप झालं. भारत सरकारने प्रथम 1958 साली त्यांचा पद्मभूषण आणि नंतर 1976 साली पद्मविभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. ब्रिटन-हॉलंड सरकारनंही त्यांच्या नावाचा गौरव केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पण त्यांचा गौरव करण्यात आला त्यांना एका पुरस्कार मध्ये मिळालेली 5 लाख रुपये इतकी रक्कम त्यांनी BNHS या त्यांच्या मातृ संस्थेकडे सुपूर्द केली.

हे नाव म्हणजे ‘सलीम मोईजुद्दीन अब्दुल अली’ अर्थात ज्येष्ठ पक्षी निरिक्षक-अभ्यासक-पर्यावरणतज्ज्ञ सलीम अली. ‘द बुक ऑफ इंडियन बर्डस्’ या त्यांनी लिहिलेल्या रसाळ-रंजक-तितकंच उद्बोधक असलेल्या पुस्तकानं अनेकांच्या प्राणी-पक्षी-पर्यावरण यासंबंधींच्या व्याख्याच बदलवून टाकल्या.

National Bird Day : पक्षी निरिक्षण-त्यांचा अभ्यास अर्थात ‘ऑर्निथाॅलाॅजी’ या विज्ञानशाखेला भारतातही मानाचं स्थान मिळवून दिलं. 1980 सालच्या सुमारास Dr salim alii यांनी भारतात पक्षी अभ्यासासाठी आणि निसर्ग संवर्धनाचे कार्य करणारी एक राष्ट्रीय स्तरीय शैक्षणिक संस्था असावी यासाठी प्रयत्नशील होते, त्यांच्या जीवनकाळात ते शक्य झाले नाही परंतु ते जेथे कार्यरत होते त्या Ministry of Environment and Forest & Climate Change, Government of India (then Ministry of Environment & Forests (MoEF)) and Bombay Natural History Society (BNHS) यांनी प्रयत्न करून 1991 साली कोईमुर या शहराजवळ Centre of Excellence dedicated to conduct research in the field of Ornithology and Natural History under the MoEF सुरू केले आणि त्या संस्थेस `Salim Ali Centre for Ornithology and Natural History (SACON)’ असे नाव सलीम अलींच्या स्मरणार्थ देण्यात आले.

केरळ येथील थत्तेक्कड येथे इर्नाकुलम जिल्ह्यात जगप्रसिद्ध Thattekkad Bird Sanctuary हे पक्षी अभयारण्य 1983 साली डॉ सलीम अली यांच्या प्रयत्नाने स्थापन करण्यात आले. त्याला SalimAli Bird Sanctuary असेही म्हणतात. तेथे 300 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे.

National Bird Day : गोवा येथील पणजी जवळ मांडवी नदीच्या किनारी असलेल्या चारोओ या गावातील कांदळवनात जवळपास 473 प्रजातींचे पक्षी नोंदवला गेले आहेत. 1988 साली घोषित झालेल्या 108 वर्ग किलोमीटर परिसरात असलेल्या या अभयारण्यात पक्ष्यां बरोबर अनेक दुर्मिळ प्राणी, मासे, वनस्पती आढळतात. या अभयारण्याला डॉ Salim Ali यांच्या गौरवार्थ Dr. Salim Ali Bird Sanctuary असे नाव देण्यात आले आहे.

भारतात असलेल्या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्याना पैकी एक असलेले श्रीनगर जिल्ह्यात 9 वर्ग किलोमीटर परिसरात आहे. जे पूर्वी City Forest National Park म्हणुन ओळखला जात असे. 1986 साली डॉ Salim Ali यांच्या सन्मानार्थ त्याचे नामकरण Salim Ali National Park असे करण्यात आले. या पार्क मध्ये Monal, Himalayan Snow Cock या दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्व आहे तसेच Kashmir Stag, Shouroo, Hangul, Himalayan Black Bear सारखे महत्त्वपूर्ण प्राणी सुद्धा येथे आढळतात.

National Bird Day : सलीम अलींच्या निधनानंतर तब्बल 25 वर्षानंतर भारतात हिमालयात नवीन शोध लागलेल्या Himalayan Forest Thrush या पक्ष्यांचे नामकरण Zoothera salimalii असे करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यापूर्वीच पाश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या एका वटवाघळाला Salim Ali’s fruit bat असे नाव देण्यात आले आहे. ‘हौशी पक्षीप्रेमी ते देशातले दिग्गज पक्षी तज्ज्ञ’ असलेल्या सलीम अलींना त्यांच्या जन्मदिनी अभिवादन🌹🦅

संकलन – फारूक म्हेतर – पक्षी अभ्यासक, कोल्हापूर.

Back to top button