नाशिक : वीजचोरी प्रकरणी आठ ग्राहकांना सव्वादोन लाखांचा दंड | पुढारी

नाशिक : वीजचोरी प्रकरणी आठ ग्राहकांना सव्वादोन लाखांचा दंड

नाशिक, चांदवड : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील विविध गावांमध्ये महावितरणमार्फत वीजचोरी पकडण्याची मोहीम राबविण्यात येत असून, महावितरणच्या नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय पवार यांनी तालुक्यातील सोग्रस गावात धडक कारवाई करत आठ ग्राहकांना दोन लाख २९ हजार ८९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

वीजचोरी करून हिटर शेगडी वापरणाऱ्या, वीजवाहक तारांवर आकडा टाकून तसेच इतर क्लृप्त्या वापरून बिनबोभाट वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने थेट कारवाईचा फास आवळला आहे. विविध मार्गांनी वीजचोरी करणाऱ्यांवर जप्तीची व दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत वापराने तालुक्यातील फीडरवर लोड येत असल्याने लाइट वारंवार ट्रीप (बंद) होत आहे. सिंगल फेज असताना कुणीही शेतीपंप, गिरणी चालवू नये. थ्री फेज सप्लाय असतानाच शेतीपंप, गिरणी चालवाव्या. ज्या ग्राहकांचे अधिकृत वीज कनेक्शन नाही अशांनी रीतसर कनेक्शन घ्यावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता यु. डी. पाटील यांनी केले आहे. तसेच तालुक्यातील विविध गावांत वीजचोरी पकडण्याचे सत्र सुरूच राहील व वीजचोरांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महावितरणकडून देण्यात

हेही वाचा :

Back to top button