बिनकामाचे इथे बसलेले लोकं सांगणार आपल्याला: किरण माने भडकले | पुढारी

बिनकामाचे इथे बसलेले लोकं सांगणार आपल्याला: किरण माने भडकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज विकास आणि किरण यांची चर्चा होताना दिसणार आहे तर दुसरीकडे अमृता देशमुख आणि किरण माने यांच्यात वाद होणार आहे. किरण माने यांना कोण वाटतं आहे बिनकामाचे. अमृता देशमुखचे म्हणणे आहे किरण माने आगाऊ आहेत.

विकास किरणला विचारताना दिसणार आहे, दादा एवढं काय ? इतका प्रॉब्लेम काय झाला आहे ? त्यावर किरण मानेंचे म्हणणे आहे, ते बरोबर आहेत तू त्यांना समजून घ्यायला चुकला आहेस. आम्हांला त्याचा शॉक बसतं नाही. तुला माहिती नाही एवढे वाईट आहेत ते. विकास आणि किरण नक्की कोणाबाबतीत बोलतं आहेत ? हे आज कळेलच.

मग त्यांनी हा विषय RJ वर नेला कि रेडिओवर भावनाच ऐकू येतात, माझं म्हणणं आहे रेडिओचा विषय काढलायं कोणी? हिच्या नॉर्मल बोलण्यात भावना नसतात. कळतं नाही हिच्या बाजूने आहे त्याच्या बाजूने आहे? त्यावर अमृता देशमुखचे म्हणणे आहे, अहो कारण माझं नावं… आणि RJ म्हणजे बोलणं आणि बोलण्यात जर तुम्ही इमोशन्स नाही म्हणता तर कसं ना? इमोशन्स वैगरे certificate यांना द्यायची गरज नाहीये. आगाऊ सारखं एक वाक्य बोलाल तर त्यानंतर होणार issue. किरण म्हणाले, तुझा आगाऊपणा लय बघितला आहे.

बिनकामाचे इथे बसलेले लोकं सांगणार आपल्याला आणि हा वाद सुरूच राहिला. अजून काय काय घडलं घरात हे आज कळेल.

 

 

 

 

Back to top button