साईबाबांच्या चरणी 18 कोटींचे दान अर्पण | पुढारी

साईबाबांच्या चरणी 18 कोटींचे दान अर्पण

शिर्डी: पुढारी वृत्तसेवा :  शिर्डी साईबाबा चरणी 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसांत तब्बल 18 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. दिवाळी सण आणि सणानिमित्त आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक भाविकांनी शिर्डी साईबाबा चरणी हजेरी लावली. या वेळी अनेकांनी भरभरून दान केल्याचे दिसते. साई संस्थानच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 15 दिवसांमध्ये मिळालेल्या दानामध्ये रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, चेक, सोनं, चांदी, परकीय चलन आदींचा समावेश आहे.

साईबाबा चरणी प्राप्त झालेले दान खालील प्रमाणेे : दक्षिणा पेटी 3 कोटी 11 लाख 79 हजार 184 रुपये, देणगी काउंटर 7 कोटी 54 लाख 45 हजार 408 रुपये, ऑनलाईन देणगी 1 कोटी 45 लाख 42 हजार 808 रुपये, चेक व डीडी देणगी 3 कोटी 3 लाख 55 हजार 946 रुपये, मनीआर्डरद्वारे 7 लाख 28 हजार 833 रुपये, डेबिट, क्रेडिट कार्ड देणगी 1 कोटी 84 लाख 22 हजार 426 रुपये, सोने 860.450 ग्रॅम सोने (39.53 लाख 29 रुपये), चांदी : 13345. 970 ग्रॅम (5.45 लाख रुपये), परकीय चलन 24.80 लाख रुपये (29 देशांचे). केवळ दिवाळीच नव्हे यंदाचे सर्वच सण नेहमीपेक्षा काहीसे वेगळे होते. कोरोना महामारीतल दोन वर्षांचा प्रदीर्घ काळ गेल्यावर प्रथमच सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होते आहेत.

Back to top button