सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरीच्या घरी गौराई आली | पुढारी

सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरीच्या घरी गौराई आली

पुढारी ऑनलाईन : गणपती हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनाने सारा आसमंत उजळून निघाला आहे. घरोघरी मोदकांचा दरवळ आणि आरतीचे सुमधूर स्वर कानी पडत आहेत. गणेशोत्सवाचा हा जल्लोष स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतही पाहायला मिळाला. गौरीच्या घरी गौराई आली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरी हिने मोठ्या आनंदात गौराईचं स्वागत केलं आहे.

शिर्केपाटील कुटुंबात बाप्पाचं स्वागत तर जंगी झालंय आणि बाप्पाच्या पाठोपाठ गौराईंचं आगमन झालं आहे.

शिर्के-पाटील कुटुंबात प्रत्येक सण अगदी जल्लोषात साजरा होतो. त्यामुळे बाप्पा आणि गौराईची साग्रसंगीत पूजाविधी पार पडली. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत सुग्रास जेवणाचा आनंदही लुटला आहे.

एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना मालिकेत नवा ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. शालिनीचा खरा चेहरा संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे. त्यामुळे माईसाहेब शालिनीला नेमका कसा धडा शिकवणार हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

गिरीजा प्रभूविषयी जाणून घ्या या गोष्टी 

गिरीजा प्रभूने या मालिकेत गौरीचे पात्र साकारले आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप आणि गिरिजा यांची केमिस्ट्री पाहायला मिळतेय. ही जोडी चाहत्यांच्या खूपच पंसतीस उतरली आहे.

गिरीजा खऱ्या आयुष्यात ऑलराऊंडर आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे. तसेच ती प्रोफेशनल डान्सरसुद्धा आहे.

झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिॲलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता.

याव्यतिरिक्त तिला चित्रकलेचीही आवड आहे. मंडाला आर्टचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गिरीजा योगादेखील करते. गिरीजा फिटनेसला प्रचंड महत्व देते.

वर्षा उसगावकर
वर्षा उसगावकर

ती हार्मोनियमदेखील वाजवते. सराव करतानाचे काही व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. गिरीजा प्रभू नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

गिरीजा उत्तम खवय्यीसुद्धा आहे. नवनवीन खाद्यपदार्थ बनवण्याची तिला खूप आवड आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या गिरीजाचा चाहता वर्ग मोठा आहे. गिरीजाच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.

गिरीजाने ‘श्रावण क्वीन’ स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यात ती उपविजेती ठरली होती.

Back to top button