harvey weinstein : हार्वे विंस्टीनने न्यूड मसाजची केली मागणी, डान्सरचा गंभीर आरोप | पुढारी

harvey weinstein : हार्वे विंस्टीनने न्यूड मसाजची केली मागणी, डान्सरचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड चित्रपट निर्माता हार्वे विंस्टीन लैंगिक केस प्रकरणी २३ वर्षांची शिक्षा भोगत आहेत. (harvey weinstein) ८० हून अधिक महिलांच्या आरोपांनंतर त्याच्यावर केस सुरु आहे. आता एका डान्सरने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने तिच्यासोबत घडलेला वाईट प्रसंग शेअर केला आहे.

डान्सरचे नाव एशली एम असं आहे. २००४ मध्ये रिलीज झालेल्या अमेरिकन डान्स म्युझिकल रोमँटिक ड्रामा हॉलीवूड चित्रपट ‘डर्टी डान्सिंग: हवाना नाईट्स’ मध्ये ती डान्सर होती. तिने हार्वे विंस्टीनवर गंभीर आरोप केले आहेत. विंस्टीनवर अनेक महिलांनी MeToo दरम्यान लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. आता अमेरिकेत लॉस एंजलिस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. ट्रायलमध्ये एशली एम नावाच्या महिलेने आपल्यासोबत झालेल्या शोषणाची वाईट घटना ऐकवली. डान्सरने सांगितलं की, २००३ मध्ये विंस्टीनने पोर्टो रीकोच्या एका हॉटेलमध्ये तिचं शोषण केलं होतं. इतकचं नाही तर डान्सरने सांगितलं की, चित्रपट निर्मात्याने तिच्याकडे न्यूड मसाजची मागणी केली होती.

न्‍यायालयातील सुनावणीवेळी डान्सर म्हणाली, जेव्हा चित्रपट निर्मात्याकडून माझं शोषण झालं होतं, तेव्ही मी २२ वर्षांची होते. या भयानक घटनेने माझ्यावर खोल प्रभाव पडला. १९ वर्षांपूर्वी झालेल्या घटनेबद्दल एशली म्हणते- “मी चित्रपटासाठी दुसऱ्या डान्सर्ससोबत बॉलरूम डान्स सीन शूट करणार होते. पण, त्यावेळी विंस्टीन मला बाहेर घेऊन गेला. त्याने मला सांगितले की, हॉलीवूड अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रोसोबत नेकेड मसाज केला आहे.  मी देखील असे केले तर  ते माझं करिअर घडवतील.”

एशली म्हणाली, विंस्टीन खूप रागात होता. एकदा तो सेटच्या बाहेर माझी प्रतीक्षा करत होता. शूटिंग संपताच त्याने मला आपल्या कारमध्ये बसायला सांगितलं. त्यावेळी मी खूप घाबरले होते. जेव्हा त्याच्या असिस्टेंटने समजावलं तेव्हा मी गाडीत बसले. मला समजत नव्हतं की, मी काय करू, मी खूप घाबरले होते. विंस्टीनने अश्लिल कृत्य करणं सुरु केलं. ते पाहून मी रडू लागली. विंस्टीन म्हणाला की, आपण काही चुकीचं करत नाही. संधी मिळताच मी तेथून पळ काढला होता”.

Back to top button