पुणे : गुंड गज्या मारणेला न्यायालयीन कोठडी | पुढारी

पुणे : गुंड गज्या मारणेला न्यायालयीन कोठडी

पुणे : व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला गुंड गज्या मारणे याच्यासह दोघांना मोक्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास करण्यासाठी पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

मयूर जगदीश जगदाळे (वय 31, रा. होळकरनगर, आंबेगाव पठार) असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या अन्य आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मारणेला 16 ऑक्टोबर रोजी सातार्‍यातील वाईतून ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाने त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत मोक्का कोठडी सुनावली होती. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.

Back to top button