Orhan Awatramani : कोण आहे औरी, जान्हवीसोबत रंगलीय डेटिंगची चर्चा | पुढारी

Orhan Awatramani : कोण आहे औरी, जान्हवीसोबत रंगलीय डेटिंगची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही कित्येकदा पाहिलं असेल की, सारा अली खान, न्यासा देवगन, करीना कपूर, करिश्मा कपूरसोबत फोटोजमध्ये किंवा अहान शेट्टीसोबत कॉन्सर्टमध्ये वा अनन्या पांडेसोबत पार्टी करताना औरी दिसला आहे. ओरहन अवत्रमणि ‘औरी’ नावाने अधिक प्रसिद्ध आहे. बॉलीवूडच्या दिवाली बॅशमध्ये औरी हा सर्व स्टार किड्ससोबत पार्टी करताना दिसतो. (Orhan Awatramani) बॉलीवूड सेलिब्रिटीजच्या अनेक दिवाळी पार्टीतील फोटोंमध्ये औरी दिसतो. कधी टशनमध्ये ट्रॅडिशनल डिझायनर पोषाखात, फुल ऑन मेकअपसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसतो. हसत-खेळत फोटोंनी तुमचं नक्कीच लक्ष वेधलं असेल. आता सर्वाधिक चर्चा आहे ती औरीच्या डेटिंगची. जान्हवी कपूरसोबत रिलेशनशीपवरून औरीची खूप चर्चा होताना दिसतेय. (Orhan Awatramani)

स्टार किड्सचे स्टार मित्र

औरीचं नाव आहे ओरहन अवत्रमणि. सारा अली खान, न्यासा देवगन, करीना कपूर, करिश्मा कपूरसोबत अनेक फोटोंमध्ये तो दिसला आहे. फोटोजमध्ये अहान शेट्टीसोबत कॉन्सर्टमध्ये वा अनन्या पांडेसोबत पार्टी करताना स्पॉट करण्यात आलं होतं. ओरहन ‘औरी’ नावाने प्रसिध्द आहे. औरी याआधीही अनेकदा बॉलीवूड सेलेब्रिटीजसोबत दिसला आहे. त्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत.

सर्व स्टार्ससोबत औरी पार्टी करताना दिसतो, पण त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. यापूर्वीदेखील औरी-जान्हवी डेट करत असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. आता या प्रकरणात कितपत सत्यता आहे हे माहित नाही. पण, जान्हवीसोबतचे अनेक फोटो औरीच्या इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले आहेत. ज्यात त्यांचे बाँन्डिग स्पष्टपणे दिसत आहे. ओरहानची केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही त्याची पोहोच आहे. कार्दशियन बहिणींसोबतही त्याचे अनेक फोटो आहेत. तिने कार्दशियन बहिणींसोबत अनेक कार्यक्रमांनाही हजेरी लावली आहे. औरी काइली जेनरच्या सर्वात जवळ आहे. दोघांचे एकत्र मस्ती करतानाचे अनेक फोटो आहेत.

सारा अली खानचा वर्गमित्र

औरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी हे मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्याला व्यावसायिक अॅनिमेटर बनायचे आहे. सारा आणि औरी केवळ मित्रच नाहीत, तर ते वर्गमित्रही आहेत. औरीने कोलंबिया विद्यापीठातून सारा अली खानसोबत शिक्षण घेतले आहे. त्याने पदवी पूर्ण केली आहे. औरीने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तो सारासोबत दिसत आहे.

औरीसोबत सारा अली खान

औरीचे केवळ बॉलीवूड किंवा हॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर अनेक व्यावसायिक कुटुंबांशीही चांगले संबंध आहेत. औरी हा ईशा अंबानीची खास मैत्रीणही मानली जाते. इन्स्टाग्रामवर त्याचे २१३ हजार फॉलोअर्स आहेत. जवळपास सर्वच बॉलीवूड सेलिब्रिटी औरीला सोशल मीडियावर फॉलो करतात. पार्ट्यांपासून ते डिनर डेटपर्यंत, त्याला लाईमलाईट कसा मिळवायचा, हे त्याला माहित आहे. औरीचा फॅशन सेन्सदेखील अप्रतिम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

Back to top button