Salman Khan : डेंग्यूतून बरा झाला सलमान, बिग बॉसमध्ये करणार वापसी | पुढारी

Salman Khan : डेंग्यूतून बरा झाला सलमान, बिग बॉसमध्ये करणार वापसी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खान डेंग्यूतून बरा झाला आहे. त्याची प्रकृती सुधारत आहे. (Salman Khan) बिग बॉसच्या सूत्रांनुसार, सलमानने गुरुवारी वीकंड का वारचे शूटिंग केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सलमानने वीकेंड का वार होस्ट केलं नव्हतं. सलमानच्या जागी करण जोहरने शो होस्ट केला. यावेळी करणने स्पर्धकांची शाळा घेतली होती. आता गुड न्यूज ही आहे की, आगामी वीकेंड का वार सलमान खान होस्ट करेल. (Salman Khan )

या शोमध्ये गेस्ट बनून चित्रपट फोन भूतची टीम येणार आहे. यामध्ये कॅटरीना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी बिग बॉस शोची शोभा वाढवतील. कॅटरीना कैफची विक्की कौशलसोबत ही पहिलीच संधी असेल की, लग्नानंतर ते दोघे पहिल्यांदाच सलमान सोबत स्क्रीनवर दिसणार आहे. दोघांचा चित्रपट टायगर ३ लवकरच रिलीज होणार आहे.

सलमानच्या प्रोजेक्टविषयी सांगायचं झालं तर ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्यानंतर टायगर ३ येईल. चित्रपटामध्ये सलमान खानसोबत कॅटरीना कैफ असेल. खलनायक म्हणून इमरान हाशमी दिसणार आहे. टायगरचा तिसरा भागदेखील यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button