riteish deshmukh : रितेश देशमुख घेऊन येतोय वेड चित्रपट | पुढारी

riteish deshmukh : रितेश देशमुख घेऊन येतोय वेड चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारा रितेश देशमुख नवा चित्रपट आणत आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘वेड’ च्या पोस्टरचे अनावरण केले. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत. (riteish deshmukh)

विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जेनेलिया यांनी हिंदी, तेलगू , तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनीने सोशल मीडियावर केली.

 

 

Back to top button