Ram Setu Collection : ‘थँक गॉड’वर भारी पडला ‘राम सेतू’, इतक्या कोटींची कमाई | पुढारी

Ram Setu Collection : 'थँक गॉड'वर भारी पडला 'राम सेतू', इतक्या कोटींची कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉक्स ऑफिसवर दोन ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज झाले. (Ram Setu Collection) अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा स्टारर राम सेतूसोबत अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह स्टारर थँक गॉड या दोन्ही चित्रपटांमध्ये जबरदस्त टक्कर मिळत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लक्षात घेता, निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांचे चांगले ओपनिंग मिळेल अशी अपेक्षा आहे. आता या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. (Ram Setu Collection)

अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या थँक गॉडने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांच्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी थिएटरमध्ये ८-९ कोटी रुपये कमावले. चित्रपटाच्या पुढील काही दिवसांच्या कलेक्शनवर बरेच काही अवलंबून आहे. मंगळवारी या चित्रपटाने २१.३२ टक्के व्यवसाय केला होता. थँक गॉडच्या निर्मात्यांना आशा आहे की पुढील काही दिवस हा ट्रेंड कायम राहील.

thank god
thank god

राम सेतूने इतके कोटी कमवले

अक्षय कुमार स्टारर राम सेतू आणि अजय देवगण-सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा थँक गॉड या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर संघर्ष सुरू आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, राम सेतू उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि गुजरातमध्ये चांगली कामगिरी करत आहे. विश्लेषकांच्या अंदाजानुसार, पहिल्या दिवसाच्या शोनंतर चित्रपट रु. १५ कोटींचा टप्पा ओलांडू शकेल.

यापूर्वीही अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्यात भांडण झाले होते. बॉक्स ऑफिसवर अजय आणि अक्षयची टक्कर होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २००९ मध्ये, अजय देवगणच्या कॉमेडी ऑल द बेस्ट: फन बिगिन्सची अक्षय कुमारच्या ॲक्शन-अ‍ॅडव्हेंचर ब्लूशी टक्कर झाली आणि २०१० मध्ये, गोलमाल ३ ची अ‍ॅक्शन रिप्ले चित्रपटाशी टक्कर झाली. या दोन्ही वेळा सिंघम स्टार विजयी झाला आणि त्याचे चित्रपट सूर्यवंशी स्टारपेक्षा अधिक यशस्वी झाले.

Back to top button