Thank God : अजय-सिद्धार्थच्या थँक गॉडने केली इतकी कमाई

thank god
thank god
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : थँक गॉड चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे ज्यांनी इश्क, धमाल आणि मस्ती सारखे चित्रपट आणले आहेत. थँक गॉड हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. (Thank God) चित्रपटात सिद्धार्थ आणि नोरा फतेही यांच्यावर चित्रित केलेले 'माणिके हिते' सारखे लोकप्रिय गाणे देखील वापरले गेले. थँक गॉडने पहिल्या दिवशी ८.१० कोटींची कमाई केली आहे. तथापि, लाँग वीकेंड लक्षात घेता चित्रपटाने गती घेतली आहे. (Thank God)

दिवाळीत अजयची सर्वात कमी ओपनिंग

दिवाळीला प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या चित्रपटांची आकडेवारी पाहिली तर इतकी कमी ओपनिंग ही गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी ओपनिंग आहे. २०१७ मध्ये, दिवाळीच्या मुहूर्तावर आलेल्या 'गोलमाल अगेन' या त्याच्या मल्टीस्टारर चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३० कोटींचे निव्वळ कलेक्शन केले होते. या चित्रपटाने २०० कोटींचा आकडा पार केला होता.

२०१६ मध्ये रिलीज झालेल्या 'शिवाय'ची ओपनिंग १० कोटींच्या आसपास होती. शिवाय हा एक अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपट होता आणि अजयने स्वतः दिग्दर्शित केला होता. २०१२ मध्ये दिवाळीला आलेल्या सन ऑफ सरदारनेही पहिल्या दिवशी १० कोटींचे कलेक्शन केले होते. १०५ कोटींचे निव्वळ कलेक्शन करून हा चित्रपट हिट ठरला होता.

अजयचा या वर्षातील दुसरा चित्रपट

या वर्षी प्रदर्शित झालेल्या अजयच्या इतर चित्रपटांशी थँक गॉडची तुलना करणे, थँक गॉड अधिक चांगले आहे. यापूर्वी रनवे ३४ एप्रिलमध्ये रिलीज झाला होता. ज्यामध्ये अजयसोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. अजयने या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. रनवे ३४ ला ने फक्त ३.५० कोटींची ओपनिंग मिळाली. मात्र, ओटीटीवर आल्यानंतर हा चित्रपट चांगलाच गाजला. अजयने आरआरआर आणि गंगूबाई काठियावाडीमध्येही भूमिका केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news