Kareena Kapoor : अरे देवा, यांची मुलंही जमिनीवर लोळतात?; जेहचे नखरे | पुढारी

Kareena Kapoor : अरे देवा, यांची मुलंही जमिनीवर लोळतात?; जेहचे नखरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनानंतर यंदाची दिवाळी सामान्यासह बॉलिवूड कलाकारदेखील मोठ्या आनंदात आणि धूमधडाक्यात साजरी करत आहेत. यात काही बॉलिवूड स्टार्संनी त्याच्या कुटूबियांसोबतचे फोटो शेअर करत दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याच दरम्यान काही कलाकांराच्या फॅशनने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने ( Kareena Kapoor ) कुटुंबासोबत उत्साहात दिवाळी साजरी केली. परंतु, करिना आणि सैफ अलीपेक्षा त्याचा छोट्या मुलगा जेह आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला.

अभिनेत्री करिना कपूरने ( Kareena Kapoor ) तिच्या इंस्टाग्रामवर दिवाळीचे औचित्य साधत ‘परफेक्ट फॅमिली’ सोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यंदाच्या दिवाळीत करिनाने लाल रंगाचा चुडीदार तर पती सैफ अली खानने ब्लॅक रंगाचा कुर्ता आणि व्हाईट रंगाचा पायजमा परिधान केला आहे. तर दोघांची मुले तैमूर अली खान आणि जेह अली खान यांनी ब्लॅक रंगाच्या कुर्ता-पायजामात खूपच क्यूट दिसत होती. परंतु, यावेळीच्या एका फोटोतील पोझने आई-वडिलांपेक्षा (करिना- सैफ) लहान मुलगा जेहचे नखरे पाहायला मिळाले.

करिना- सैफ नेहमी त्याच्या कुटूबियांला आनंदात ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. परतु, दिवाळी दिवसात जेहला मात्र, फोटोला पोझ द्यायला अजिबात आवडलेले दिसत नाही. कारण, यावेळी करिना, सैफ आणि तैमूर आनंदात असल्याचे दिसून येत आहे. तर लेह यावेळी जमिनीवर खाली झोपलेला असून रडताना आणि लोळताना दिसतोय. यावेळी जेहला तैमुर उठवत असतो. परंतु, त्याला कोणती तरी गोष्ट आवडलेली दिसत नाही यामुळे ते असे वागताना दिसतोय. जेहच्या या नखऱ्यामुळे सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे. करिनाने या फोटोला ‘This is Us ❤️ From mine to yours… Happy Diwali friends ❤️ Stay Blessed ❤️’. अशी कॅप्शन दिली आहे.

करिनाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात आलिया भट्टने ‘Cutest ❤️❤️❤️❤️’, अस्था शर्मा, झोया अख्तर, महिप कपूर या स्टार्सनी दिवाळीच्या शुभेच्छा देत कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी ‘अरे देवा, यांची मुलंही जमिनीवर लोळतात का?’, ‘जेह रडतोय हे काही नवीन नाही. तर आमच्या आजूबाजूची मुलं तमाशा करतात. हे नॉर्मल आहे, जेहला का रडतोय?’, ‘जेहला काही हवं आहे काय?’, ‘ सहसा मध्यम वर्गात असेच होते’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

करिना आमि सैफने जेहचा पहिला वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला होता. करिना बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटामध्ये दिसली होती. तर सैफ अली खान लवकरच ‘आदिपुरुष’ मध्ये दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button