Urfi Javed : म्युझिक व्हिडिओतील ड्रेसवरून उर्फी अडचणीत, अश्लीलता पसरवण्याचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत राहते. तिची अतरंगी फॅशन स्टाईल तिला नेहमी पब्लिसिटी मिळवून देते. उर्फी आता टीव्ही स्टार ते फॅशन क्वीन बनली आहे. पण, ती आता एका प्रकरणामुळे अडचणीत आली आहे. नुकताच रिलीज झालेला एक म्युझिक व्हिडिओ ‘हाय हाय ये मजबूरी’ (Haaye Haaye Ye Majboori) मुळे ती अडचणीत आली आहे. तिच्या विरोधात दिल्लीतील एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Urfi Javed)
ही तक्रार कुणी दाखल केली आहे, त्या व्यक्तीचं नाव तर समोर आलेलं नाही. पण, या व्हिडिओच्या माध्यमातून उर्फीवर अश्लीलता पसरवण्याचा आरोप लागला आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, उर्फी लेटेस्ट गाणं हाय हाय ये मजबूरीच्या माध्यमातून असा कंटेंट पब्लिश आणि ट्रान्समिट करत आहे, जो अश्लील आहे. याप्रकरणी उर्फीने आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गाण्याच्या शूटिंगवेळी उर्फी झोपाळ्यावरून खाली पडली…
हे गाणं ११ ऑक्टोबर रोजी यूट्यूबवर रिलीज झालं. या गाण्यात उर्फीने लाल साडी नेसून डान्स केलं आहे. हे गाणे जेव्हा रिलीज झाले, तेव्हापासून ट्रेंडिंग आहे. या गाण्याला एका दिवसात जवळपास ८ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. गाण्यात उर्फी बोल्ड अंदाजात दिसत आहे. दरम्यान, गाण्याच्या शूटिंगवेळी उर्फी झोपाळ्यावरून खाली पडली होती.
- बिग बॉस मराठीच्या घरात अमृता फडणवीस यांची एन्ट्री
- Shweta Shinde : श्वेताची क्रिम कलर साडी अन् लांबलचक मंगळसूत्र
- नाशिक : पिंपळनेरमध्ये ६ घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान
View this post on Instagram